जिल्हाधिकारी देवेंदर सिंह यांचे आवाहन
रत्नागिरी, ता. 11 : मतदार संघातील प्रिय ज्येष्ठ नागरिक मतदारांनो, जिल्हाधिकारी या नात्याने, मी आपणास मनापासून शुभेच्छा देतो आणि आतापर्यंत आपण नियमित मतदान करुन नव्या पिढीसमोर आदर्श ठेवला आहात, त्या बद्दल आपले आभार देखील मानतो. असे म्हणत रत्नागिरीचे जिल्हाधिकारी तथा निवडणुक निर्णय अधिकारी देवेंदर सिंह यांनी यावेळीही लोकसभेसाठी मतदान करण्याचे मतदारांना आवाहन केले. Exercising the voter’s right to vote

आपल्या ४६ रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघासाठी मंगळवार दि. ७ मे रोजी मतदान होत आहे. आपल्या मतामध्ये रत्नागिरी जिल्ह्याच्या आणि संपूर्ण भारताच्या तरुण पिढीला प्रेरित करण्याची ताकद आहे. आपण सर्वांनी मतदान केंद्रावर जाऊन अभिमानाने आणि आत्मविश्वासाने मतदान करावे, ज्यांचे वय ८५ वर्षापेक्षा जास्त आहे त्यांना घरातूनच मतदान करण्याची ऐच्छिक सुविधा निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिली आहे. त्याचाही लाभ घ्यावा. तुमचे मत हे लोकशाही प्रक्रियेत महत्त्वाचे योगदान आहे. तुमच्या मतदानामुळे लोकशाही अधिक बळकट होणार आहे. निश्चितच आपण यंदाही उच्चांकी मतदान करुन सर्वांसमोर आदर्श ठेवाल, अशी अपेक्षा ठेवतो, असे जिल्हाधिकारी सिंह म्हणाले. Exercising the voter’s right to vote
