गुहागर, ता. 25 : तालुक्यात एकूण ६६ ग्रामपंचायती आहेत. या ग्रामपंचायतींमध्ये सरपंच महोदय/ महोदया कार्यरत आहेत. या कार्यरत असलेल्या सरपंच संघटनेचा कार्यकाल समाप्त झाल्यामुळे नवीन कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांची निवड सर्वांच्या सहमतीने करण्यात आली. ही सभा शनिवार दि. २३ डिसेंबर रोजी पाटपन्हाळे ग्रामपंचायत सभागृहात घेण्यात आली. सभेमध्ये ११ पदाधिकाऱ्यांची नवीन कार्यकारिणी गठीत करण्यात आली. आहे. Executive of Taluka Sarpanch Association

या कार्यकारिणीमध्ये अध्यक्ष श्री.मंगेश तानाजी सोलकर, उपाध्यक्ष सौ.वैष्णवी वैभव नेटके, सचिव श्री.जनार्दन पांडुरंग आंबेकर, कार्याध्यक्ष श्री.सचिन रामचंद्र म्हसकर, खजिनदार श्री.समित सत्यवान घाणेकर, सदस्य सौ.प्रियांका निलेश सुर्वे, सदस्य सौ.आर्या अमित मोरे, सदस्य सौ.जान्हवी धनंजय विखारे, सदस्य श्री.आशीर्वाद दयानंद पावसकर, सल्लागार श्री.विजय अर्जुन तेलगडे, सल्लागार श्री.नारायण धाकू आग्रे या पदाधिकाऱ्यांची निवड सर्वांच्या सहमतीने करण्यात आली. Executive of Taluka Sarpanch Association

तसेच नवनिर्वाचित गुहागर तालुका सरपंच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना संघटनेचे मावळते अध्यक्ष चैतन्य धोपावकर, सचिव सचिन म्हसकर, खजिनदार महेश जामसूदकर आणि सल्लागार प्रविण वेल्हाळ यांनी शुभेच्छा दिल्या. Executive of Taluka Sarpanch Association


