शहरप्रमुखपदी निलेश मोरे तर शहर संघटकपदी सिद्धिविनायक जाधव
गुहागर, ता.18 : शिवसेनेची गुहागर शहर कार्यकारिणी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन कदम यांनी आमदार भास्कर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली जाहीर केली आहे. गुहागर शहरप्रमुख पदी निलेश मनोहर मोरे, गुहागर शहर संघटकपदी सिद्धिविनायक जाधव, उपशहर प्रमुख पदी मनीष मोरे व प्रवीण रहाटे यांची निवड करण्यात आली आहे. Executive of Shiv Sena


या शहर कार्यकारिणीमध्ये विभागप्रमुख पदी राकेश कमळाकर साखरकर, दत्ता जांगळी, वीरेंद्र साळवी, विलास नार्वेकर, उपविभाग प्रमुख पदी सचिन खरे, समीर कनगुटकर, अविनाश सांडीम, दिलीप गुरव, संजय पवार, संतोष गुहागरकर, विकास जाधव, शोधन वराडकर, तर शाखाप्रमुखपदी वीरेश मुरलीधर बागकर, अतुल दत्तात्रय साखरकर, दीपक वसंत कानसरे, तुषार दशरथ जांगळी, शैलेश विलास भोसले, राहुल मुरलीधर जाधव, कल्पेश रवींद्र बागकर, प्रशांत सुधाकर रहाटे, चंद्रकांत हरिचंद्र साळवी, अंकुर विश्वनाथ रहाटे, अरुण गणपत भागडे, विष्णू होळंब, विनोद देवाळे, रोहन विखारे, सिध्दार्थ वराडकर, अनिकेत भोसले यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीचे आमदार भास्कर जाधव, तालुका प्रमुख सचिन बाईत यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. Executive of Shiv Sena


या सर्वांच्या निवडीमुळे गुहागर शहरातील शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. Executive of Shiv Sena