• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
8 June 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

शौचखड्ड्यात पडला बैल

by Mayuresh Patnakar
June 9, 2023
in Guhagar
68 1
0
Excellent performance of Guhagar Nagar Panchayat staff
134
SHARES
383
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर नगरपंचायत कर्मचाऱ्यांनी काढले बाहेर

गुहागर, ता. 09 : नगरपंचायत कर्मचाऱ्यांनी शहराचा पाणी पुरवठा सुरळीत केल्यानंतर पुन्हा एकदा कौतुकास्पद कामगिरी केली. वरचापाट येथील शेटे यांच्या शौचालयाच्या खड्ड्यात एक बैल पडला. कोणाचीही मदत न घेता एकीच्या बळावर या कर्मचाऱ्यांनी या बैलाला बाहेर काढले. सध्या नगरपंचायतीमध्ये लोकप्रतिनिधी नाहीत. स्वतंत्र मुख्याधिकारी वा जबाबदार प्रशासकीय अधिकारी नाहीत. अशा स्थितीत सामुहिक निर्णय घेऊन त्वरीत अंमलबजावणीचे काम नगरपंचायत कर्मचारी करीत आहेत. म्हणून ते अभिनंदास पात्र आहेत. Excellent performance of Guhagar Nagar Panchayat staff

गुहागर नगरपंचायतीमधील लोकप्रतिनिधींची मुदत एप्रिल महिन्याच्या अखेरीस संपली. नगरपंचायतीवर अद्याप प्रशासकाची नेमणूक झालेली नाही. चिपळूण नगर पालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रसाद शिंगटे यांच्याकडेच गुहागर नगरपंचायतीचा अतिरीक्त पदभार आहे. गुहागर नगरपंचायत क वर्गात मोडत असल्याने येथे सहाय्यक मुख्य कार्यकारी अधिकारी पद नाही. आजपर्यंत प्रशासकीय अधिकारी म्हणून पेढांबकर काम पहात होते. मात्र त्यांचीही रायगड जिल्ह्यात बदली झाली. नवे प्रशासकीय अधिकारी अजुन दाखल झालेले नाही. अशा स्थितीत सध्या गुहागरची नगरपंचायत एका अर्थाने निर्नायकी आहे. मात्र येथील अन्य अधिकारी व कर्मचारी पूर्ण क्षमतेने नगरपंचायतीचा कारभार चालवत आहेत. Excellent performance of Guhagar Nagar Panchayat staff

पाच दिवसांपूर्वी रविवारी (ता. 4) गुहागरला पाणी पुरवठा करणारी विहीर आटली. शहरातील पाणी पुरवठा ठप्प झाला. तातडीने कार्यवाही झाली नसती तर सोमवारी (ता. 5) पाणी आले नसते. मात्र नगरपंचायतीमधील प्रशासन सेवेतील कर्मचारी जनार्दन साटले व सुनील नवजेकर यांनी पाणी पुरवठा विभागातील अनुभवी कर्मचाऱ्यांना सोबत घेवून पाणी प्रश्र्न कसा सोडवायचा याचा निर्णय घेतला. त्यानंतर पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या कर्मचाऱ्यांनी एकत्रीतपणे पाण्याची समस्या सोडवली. Excellent performance of Guhagar Nagar Panchayat staff

गुरूवारी (ता. 8) वरचापाट येथील शेटे यांच्या घरामागील शौचालयाच्या उघड्या खड्ड्यात एक उनाड सोडलेला बैल पडला. याची माहिती नगरपंचायत कर्मचाऱ्यांपर्यंत पोचली. वास्तविक खासगी मालकाचा बैल, खासगी जागेतील शौचखड्ड्यात पडला होता. तसेच निर्णय घेणारा अधिकारी नगरपंचायतीत नाही. या दोन सबळ गोष्टींच्या आधारे नगरपंचायत कर्मचारी हे काम नाकारु शकले असते. मात्र मुक्या जनावराचा जीव वाचावा म्हणून गुहागर नगरपंचायत प्रशासकीय कर्मचारी सुनील नवजेकर, स्वच्छता विभागातील कर्मचारी मनोज घाडे, आशिष सांगळे, नीलेश मोहिते, अभिजित मोरे, विजय घाणेकर, आशिष मोहिते, कांतिदिप सावंत, जगन्नाथ घोरपडे, राजेंद्र परकर, विकेश जाधव, गणेश पावसकर  यांनी या बैलाला वाचविण्याचे निश्चित केले. घाणीने भरलेल्या खड्ड्यात उतरुन बैलाला दोरीने बांधण्यात आले. या दोऱ्या जाड लाकडी काठीत अडकवून सर्वांनी बैलाला बाहेर काढले. खड्ड्यात पडलेला बैल इतका घाबरला होता की खड्ड्यातून बाहेर पडल्यावर हा बैल दोरीसकट पळून गेला. त्यामुळे नगरपंचायत कर्मचाऱ्यांना बैलाच्या कानावरील टॅग वाचून मालकाची ओळख पटवणेही शक्य झाले नाही. Excellent performance of Guhagar Nagar Panchayat staff

Tags: Excellent performance of Guhagar Nagar Panchayat staffGuhagarGuhagar Nagar PanchayatGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagaroxUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्याबैलमराठी बातम्यालोकल न्युज
Share54SendTweet34
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.