गौरवण्यात आलेल्या ४० खाणींमध्ये महाराष्ट्रातील ६ खाणींचा समावेश
नागपूर, ता. 19 : देशातील प्रगत राज्य असा लौकिक असलेल्या महाराष्ट्राने स्टार्टअप, खनिकर्म पशुसंवर्धन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. यासाठी केंद्र सरकारचे तीन पुरस्कार पटकावले आहेत. एकाच महिन्यात मिळालेल्या तीन पुरस्कारांनी महाराष्ट्राचा सन्मान दिल्लीत वाढला आहे. केंद्र शासनाच्या पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी योजनेत जास्तीत-जास्त उद्योजकांना प्रेरित करण्यासाठी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे. केंद्रीय उद्योग खात्याच्या ‘स्टार्टअप रँकिंग’मध्ये महाराष्ट्राने ‘टॉप परफॉर्मर’ पुरस्कार पटकावून या क्षेत्रातील आघाडीवर शिक्कामोर्तब ‘स्टार्टअप्स’ क्षेत्रातील उत्कृष्ट खनिज केले. Excellent performance by Maharashtra
मान्यताप्राप्त स्टार्ट अप्समध्ये महाराष्ट्र अव्वल क्रमांकावर आहे. देशातील एकूण ७२ हजार ७०२ मान्यताप्राप्त स्टार्टअप्सपैकी १३ हजार ४५० महाराष्ट्रातील आहेत. खनिज क्षेत्रातील योगदानासाठी महाराष्ट्राला राष्ट्रीय पुरस्काराने नुकतेच गौरवण्यात आले. १२ जुलैला दिल्लीत झालेल्या खाण व खनिज संमेलनात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते व खनिकर्ममंत्री प्रल्हाद जोशी यांच्या उपस्थितीत महाराष्ट्राला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. विदर्भातील सहा खाणींना पुरस्कार देताना देशातील उत्कृष्ट कार्यासाठी गौरवण्यात आलेल्या ४० खाणींमध्ये महाराष्ट्रातील ६ खाणींचा समावेश आहे. या सहा खाणी विदर्भातीलच आहेत. Excellent performance by Maharashtra