रत्नागिरी, ता.10 : जिल्हा रुग्णालय रत्नागिरी, अनुष्का फौंडेशन व JSW फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने उप जिल्हा रुग्णालय, कामथे येथे नुकतीच क्लब फुट क्लिनिक (वाकडे पाय) ची स्थापना करण्यात आली आहे. क्लब फुट क्लिनिक दर गुरुवारी उप जिल्हा रुग्णालय कामथे येथील अस्थिरोग बाह्य रुग्ण विभाग येथे सुरु राहील. Establishment of Club Foot Clinic at Kamthe
क्लब फुट (वाकडे पाय) हा जन्मजात दोष आहे. जो भारतातील प्रत्येक ८०० मुलांपैकी एका नवजात बालकात आढळून येतो. यावर जन्मानंतर वेळीच उपचार न केल्यास मुलाला आयुष्यभर अपंगत्व येऊ शकते. योग्य उपचाराने क्लब फुट पूर्णपणे बरा होतो आणि आजीवन येणारे अपंगत्व सहजपणे टाळता येते. याकरिता सर्व उपचार विनामूल्य केले जातात. गरजूंनी उप जिल्हा रुग्णालय कामथे येथे क्लब फुट उपचार संदर्भात कामकाज पाहणारे किशोर शिताळे यांना ८४११९ ८८३०९ या मोबाईल क्रमांकावर वर संपर्क साधावा. तसेच क्लब फुट क्लिनीक चा फायदा जास्तीत जास्त गरजूंनी करून घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले (गावडे) यांनी केले आहे. Establishment of Club Foot Clinic at Kamthe