माजी तालुकाध्यक्ष, जिल्हा सरचिटणीस व अन्य पदाधिकाऱ्यांचा समावेश
गुहागर, ता.06 : गुहागर मतदार संघातील तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी तालुकाध्यक्ष, जिल्हा सरचिटणीस, अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष आदिंसह अन्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आ. भास्करराव जाधव यांच्यावर विश्वास ठेऊन खेड येथे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभेत ठाकरे गटात प्रवेश केला. Entry of NCP officials into Thackeray group
निवडणूक आयोगाच्या निकालानंतर उद्धव ठाकरे यांची खेड येथे पहिलीच सभा पार पडली. राज्यात ठाकरे यांना सोडून पदाधिकारी शिंदे यांच्या शिवसेनेसोबत जात असताना गुहागर मतदार संघात मात्र उलटे चित्र दिसून येत आहे. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून पक्षात सक्रिय असलेले जिल्हा सरचिटणीस विजय मोहिते, माजी तालुकाध्यक्ष राजेंद्र आरेकर, अल्पसंख्याक सेलचे तालुकाध्यक्ष लतिफ लालू, गुहागर विधानसभा सेक्रेटरी जगदीश गडदे, तवसाळ राष्ट्रवादी गाव कमिटी अध्यक्ष रमेश कुरटे, काताळे ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच सौ. नम्रता निवाते, चंद्रकांत निवाते, प्रकाश घाणेकर, प्रकाश पाडदले, युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे सेक्रेटरी विजय नाचरे आदींनी ठाकरे गटात प्रवेश केला. Entry of NCP officials into Thackeray group
यावेळी विजय मोहिते यांनी, येत्या काळात आ. भास्करराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ठाकरे गट अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्न करू, असा विश्वास व्यक्त केला. Entry of NCP officials into Thackeray group