राज्य सरकार अलर्ट; सर्व जिल्ह्यांना दक्षता घेण्याचे आवाहन
मुंबई, ता. 21 : गेल्या काही दिवसापासून कोरोनाचे नवीन रुग्ण राज्यात सापडत आहेत. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. केरळमध्ये सापडलेल्या जे एन. १ या नवीन व्हेरियंटने राज्यातही एंट्री केली आहे. या पार्श्वभूमीवर सर्व जिल्ह्यांना दक्षता घेण्याचे आवाहन राज्याच्या आरोग्य विभागाने केले आहे. Entry of a new variant of Corona in the state
राज्यात काही ठिकाणी नवीन रुग्ण सापडत असले तर दक्षता घ्यावी मात्र घाबरण्याची गरज नसल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे सर्व लोकांनी आवश्यकतेनुसार गरजेच्या ठिकाणी मास्क घालणे, वारंवार हात धुणे व इतर कोविड योग्य वर्तन गरजेचे असल्याच्या सूचना केल्या आहेत. राज्यात सध्याच्या घडीला एकूण कोरोनाचे एकूण ४५ सक्रिय रुग्ण असून ते विविध ठिकाणी उपचार घेत आहेत. तसेच बुधवारी राज्यात १४ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. यामध्ये मुंबई – ४, ठाणे मनपा -३ , रायगड -१, पुणे मनपा – ४, पिंपरी चिंचवड मनपा – २ रुग्णांचा समावेश आहे. तसेच ४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. एक रुग्ण अतिदक्षता विभागात असल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे. Entry of a new variant of Corona in the state

आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी निवेदन जारी केलं असून राज्यात जिनोम सिक्वेन्सिंग करण्यात येत आहे. आज राज्यात JN.1 या व्हेरियंटचा रूग्ण आढळला आहे. सिंधुदुर्ग येथील ४१ वर्षीय पुरूष नव्या व्हेरिएंटने संक्रमित आढळला आहे. यामुळे सर्व जिल्ह्यांना सतर्कतेच्या सूचना देण्यात येत असून आवश्यकतेनुसार गरजेच्या ठिकाणी मास्क घालणे, वारंवार हात धुणे तसेच कोविड टाळण्यासाठी योग्य काळजी घेणे गरजेचे असल्याचं आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केलं आहे. राज्यात नव्या व्हेरियंटच्या एंट्रीने सर्व जिल्हयांना दक्षता घेण्याचे कळविले असून, रुग्णांचे सर्वेक्षण अधिक सक्षम करण्यासाठीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या सर्वेक्षणांमध्ये आढळून आलेल्या I.L.I आणि SARI रुग्णांचे कोविड चाचणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याबरोबर सर्व जिल्ह्यांना कोविड चाचण्या वाढविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. Entry of a new variant of Corona in the state
