• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
15 February 2026, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

काथ्यावर आधारित उद्योजकता विकास प्रशिक्षण

by Ganesh Dhanawade
March 8, 2023
in Guhagar
195 2
0
Entrepreneurship development training at Guhagar
384
SHARES
1.1k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर भंडारी भवन येथे दि. 10 रोजी सकाळी 11 वाजता

गुहागर, ता. 08 : महाराष्ट्र काथ्या धोरण 2018 यानुसार गुहागर येथे मोफत एक दिवसीय उद्योजकता परिचय कार्यक्रम तथा 30 दिवसीय उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण गुहागर भंडारी भवन सभागृहात दि. 10 मार्च 2023 रोजी स. 11 वा. सुरू होणार आहे. Entrepreneurship development training at Guhagar

Entrepreneurship development training at Guhagar

महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र काथ्या धोरण 2018 अंतर्गत महाराष्ट्र राज्य लघु उद्योग विकास महामंडळ (MSSIDC) मुंबई पुरस्कृत तथा महाराष्ट्र उद्योजकता विकास केन्द्र (MCED) रत्नागिरी कार्यालयातर्फे काथ्या उद्योगाचे संवर्धन, प्रचार व प्रसार करण्यासाठी मोफत उद्योजकता परिचय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. कोकण विभाग काथ्या उद्योग व्यवसाय मधील उद्योग संधी, महाराष्ट्र कोकण विभाग काथ्या धोरण – 2018 बद्दलची माहिती या सोबत विविध काथ्या उद्योगांची माहिती, आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे काथ्यावर आधारित कुटीरोद्दोग कसा करावा बाबत माहिती व मार्गदर्शन तज्ञ व शासकीय – निमशासक अधिकार्यांमार्फत केले जाणार आहे. विविध शासकीय कर्ज योजना व सबसिडी योजनांची माहिती देखील या कार्यक्रमात दिली जाणार आहे. Entrepreneurship development training at Guhagar

या कार्यक्रमात 18 ते 50 वयोगटातील स्त्री – पुरुष, बेरोजगार युवक, युवती, महिला, बचत गट सदस्य भाग घेऊ शकतात. शिक्षण 7 वी पास आवश्यक आहे. या एकदिवसीय मोफत प्रशिक्षण कार्यक्रमात उपस्थित प्रशिक्षणार्थी मधून निवडक प्रशिक्षणार्थीना एक महिना कालावधीचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यात पुर्ण वेळ उपस्थित असणाऱ्या लाभार्थांना शासनाने प्रमाणपत्र व 2000 रू. विद्या वेतन दिले जाणार आहे. तरी इच्छुक युवक- युवतींनी, महिलांनी शुक्रवार दि. 10 रोजी स. 11 वा भंडारी भवनात उपस्थित रहावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य लघु उद्योग विकास महामंडळ मुंबई व महाराष्ट्र उद्योजकता विकास केन्द्र रत्नागिरी यांनी केले आहे. Entrepreneurship development training at Guhagar

Tags: Entrepreneurship development training at GuhagarGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share154SendTweet96
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.