रत्नागिरीत मान्यवरांच्या उपस्थित आज होणार गौरव
गुहागर, ता. 11 : अभिषेक एन्टरप्रायईझेसचे (Abhishek Enterprises) मालक पंढरी जयराम किर्वे यांना फेडरेशन ऑफ रत्नागिरी डिस्टिक चेंबर ऑफ कॉमर्स आणि इंडस्ट्रीज या संस्थेच्या वतीने उद्योजक्ता पुरस्कार आज (रविवार दि. 11 जून रोजी) प्रदान करण्यात येणार आहे. नूकताच बिझनेस एक्सप्रेस श्री फांऊडेशन सांगली यांच्यावतीने विशेष सेवाश्री पुरस्कार देवून पंढरी किर्वे यांना गौरविण्यात आले होते. Entrepreneurship award announced to Pandhari Kirve

फेडरेशन ऑफ रत्नागिरी डिस्टिक चेंबर ऑफ कॉमर्स आणि इंडस्ट्रीज या संस्थेच्या वतीने रत्नागिरी जिल्हा उद्योजकता पुरस्कार जाहीर करण्यात आले. यामध्ये अभिषेक एंटरप्रायझेस गुहागर, फायरटेक इक्विपमेंट सिस्टीम प्रा. लि. लोटे परशुराम, एमकेए इंजिनिअर्स अँण्ड एक्स्पोर्टर्स, रत्नागिरी, क्वालिटी बेकर्स चिपळूण, प्रांजल पॉलिमर्स दापोली, साखरकर बेकरी राजापूर, विजय स्वप्न इन्फोटेक चिपळूण या उद्योगांचा समावेश आहे. तसेच डॉ. के. एच. घरडा यांचा जीवन गौरव पुरस्काराने ते विनती ऑरगॅनिक लि. लोटे परशुराम यांना कार्पोरेट सोशल रिस्पन्सिबिलिटी पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. Entrepreneurship award announced to Pandhari Kirve

पुरस्कार वितरण सोहळा रविवार दि. 11 जून रोजी सायंकाळी 4 वा. श्रद्धा साफल्य मंगल कार्यालय, एमआयडीसी रत्नागिरी येथे होणार आहे. या सोहळ्याला महाराष्ट्राचे उद्योग मंत्री उदय सामंत, माजी केंद्रीय रेल्वे आणि उद्योग मंत्री सुरेश प्रभु, पत्रकार डॉ. उदय निरगुडकर, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे अध्यक्ष ललित गांधी आदी मान्यवर उपस्थित रहाणार आहेत. Entrepreneurship award announced to Pandhari Kirve
ओळख अभिषेक एन्टरप्राईझेसची
गुहागर तालुक्यातील वरवेली येथे असलेल्या अभिषेक एन्टरप्राईझेस (Abhishek Enterprises) या उद्योगामध्ये पंचतारांकित हॉटेल तसेच फॅशनेबल कपड्यासाठी लागणारी विविध आकारांची तसेच विविध प्रकारची बटणे, बेल्ट, वेगवेगळ्या धातुंपासुन बटणे, बक्कल, लेटर बेल्ट, धातुंपासून मेडल अशी विविध उत्पादने बनविली जातात. या उद्योगाद्वारे गुहागरच्या ग्रामीण भागातील अनेक महिलांना रोजगार मिळाला आहे. या उद्योगाचे कार्पोरेट ऑफीस मुंबईमध्ये असून उपनगरातही बटण उत्पादनाचे काम चालते. 500 हून अधिक जणांना रोजगार देणाऱ्या अभिषेक एन्टरप्राईझेस या उद्योगाला आजपर्यंत 479 पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. Entrepreneurship award announced to Pandhari Kirve

पंढरी किर्वे हे उद्योजक आहेतच त्याशिवाय कोकणातील लोककलांना बळ मिळण्यासाठी ते प्रयत्नरत असतात. तसेच कला, क्रीडा, आरोग्य, शिक्षण आदी सामाजिक क्षेत्रांना ते मदत करत असतात. गेल्या तिन महिन्यात नवराष्ट्र वृत्तपत्र, बिझनेस एक्सप्रेस श्री फांऊडेशन सांगली यांच्यावतीने उद्योजक म्हणून त्यांचा सन्मान करण्यात आला. आज फेडरेशन ऑफ रत्नागिरी डिस्टिक चेंबर ऑफ कॉमर्स आणि इंडस्ट्रीज या रत्नागिरी जिल्ह्यातील उद्योग क्षेत्रात काम करणाऱ्या नामांकित संस्थेकडून तिसऱ्यांदा उद्योजकता पुरस्काराने त्यांचा गौरव होत आहे. त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. Entrepreneurship award announced to Pandhari Kirve
