गुहागर, ता. 05 : रिगल कॉलेज शृंगारतळीमध्ये SNDT महिला विद्यापीठांतर्गत BCA(बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन) हा तीन वर्षाचा डिग्री कोर्स सुरू आहे. आजवर बीसीए या पदवी अभ्यासक्रमासाठी कोणत्याही प्रकारची प्रवेश पात्रता परीक्षा (सीईटी) अनिवार्य नव्हती. मात्र, शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून अशा अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षा देणे बंधनकारक आहे. याबद्दल पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये जागरूकतेचा अभाव असल्याने रिगल कॉलेज शृंगारतळीमार्फत दि. १ एप्रिल २०२४ ते ८ एप्रिल २०२४ पर्यंत या परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी इ. १२ वीच्या विद्यार्थिनींसाठी मोफत कार्यशाळेचे आयोजन केलेले आहे. तसेच या परीक्षेचे फॉर्म रिगल कॉलेज, शृंगारतळी येथे ९.०० ते ४.३० या वेळेत मोफत भरून मिळतील. Entrance test for BCA is mandatory
आजवर सीईटी नसल्यामुळे अनेक विद्यार्थी अगदी शेवटच्या टप्प्यात बीबीए, बीसीए, बीएमएस आदी अभ्यासक्रमांचा प्रवेश निश्चित करत होते. आता मात्र सीईटी अनिवार्य असल्याने या प्रक्रियेत नसलेल्या विद्यार्थ्यांना यापैकी एकाही अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी तातडीने सीईटीचा अर्ज भरवा, असे आवाहन रिगल कॉलेज, शृंगारतळीच्या वतीने करण्यात आले आहे. Entrance test for BCA is mandatoryसीईटी च्या नोंदणीची शेवटची तारीख – ११ एप्रिल २०२४ आहे. परीक्षा फी – खुला वर्गासाठी – ₹ १०००/- मागासवर्ग व इतर मागासवर्ग – ₹ ८००/- नोंदणी – www.mahacet.org या संकेतस्थळावर करावी. सीईटी परीक्षेची तारीख – २७ ते २९ मे २०२४ आहे. Entrance test for BCA is mandatory
BCA या अभ्यासक्रमाचे वाढते महत्व लक्षात घेता या कोर्सला व्यावसायिक किंवा प्रोफेशनल अभ्यासक्रम म्हणून वलय तर प्राप्त झाले त्याचबरोबर इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांप्रमाणे पात्रता परीक्षाही अनिवार्य झाली आहे. अधिक माहितीसाठी पालक व विद्यार्थ्यांनी रिगल कॉलेज, शृंगारतळी, तौहिद मॉल मो. ७०६६०३४२०० येथे संपर्क साधावा, असे आवाहन रिगल कॉलेज, शृंगारतळीच्या प्राचार्या सौ. रेश्मा मोरे यांनी केले आहे. Entrance test for BCA is mandatory