गुहागर, ता. 16 : जिल्हा परिषद केंद्रशाळा मळण नं. १ येथे शाळेच्या पहिला दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी प्रभातफेरी, नवागतांचे स्वागत, शाळापूर्व तयारी मेळावा क्र. २ , पाठ्यपुस्तकांचे वाटप, मिष्टान्न भोजन असे उपक्रम पार पडले. Entrance Festival of Malan School
गावचे सरपंच श्री. नारायण गुरव, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. जितेंद्र पाटील, उपाध्यक्ष संजीवनी शिगवण, शाळेच्या विविध समित्यांचे पदाधिकारी व सदस्य, पालक व ग्रामस्थ उपस्थित होते. शाळेच्या कार्यक्षेत्रातील तीनही अंगणवाडीताई व मदतनीस यांची शाळापूर्व तयारी मेळाव्याच्या निमित्ताने सक्रीय उपस्थिती होती. Entrance Festival of Malan School
प्रभातफेरी पार पडल्यानंतर नवीन प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे औक्षण करण्यात आले. विद्यार्थ्यांचे व पालकांचे स्वागत करण्यात आले. सरपंचाचे हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमापूजन पार पडले. यांनतर शाळापूर्व तयारी मेळाव्याचे सरपंचांचे हस्ते उद्घाटन करण्यात आले. शाळापूर्व तयारी उपक्रमांतर्गत शाळा मळण नं. १ व शाळा मळण तळेकोंड या शाळेच्या विद्यार्थांच्या विविध कृती घेण्यात आल्या. यानंतर सर्व विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आहे. सरपंच व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षांनी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा व्यक्त केल्या. Entrance Festival of Malan School
यावेळी बोलताना शाळेच्या सर्व गरजांसाठी ग्रामपंचायतीच्या वतीने सहकार्य करणार असल्याचे सांगून सर्व विद्यार्थ्यांनी अभ्यासात चांगली प्रगती करावी व आपल्या गावाचे नाव उज्ज्वल करावे, अशा शुभेच्छा व्यक्त केल्या. यावेळी सरपंचांनी सर्व विद्यार्थ्यांना पेढे वाटप केले. आज शाळेकडून विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजन देण्यात आले. यावेळी पार पडलेल्या सर्व उपक्रमांत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. शाळेचे सर्व शिक्षक व अंगणवाडी ताई व मदतनीस यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नियाजन केले होते. Entrance Festival of Malan School