शासन आपल्या दारी अंतर्गत उपक्रम, 500 जागांसाठी भरती
रत्नागिरी, दि.18 : “शासन आपल्या दारी” उपक्रमांतर्गत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र रत्नागिरी आणि जिल्हा उदयोग केंद्र रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हयातील बेरोजगार उमेदवारांना विविध क्षेत्रातील रोजगारांच्या संधी उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने “पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा” दि. २३ मे २०२३ रोजी सकाळी १० वाजता औदयोगिक प्रशिक्षण संस्था, नाचणे रोड, रत्नागिरी येथे आयोजित करण्यात येणार आहे. Employment fair in Ratnagiri

या रोजगार मेळाव्याकरिता विविध खाजगी आस्थापनाकडून 500 हून अधिक रिक्त पदांची मागणी करण्यात आलेली आहे. त्यामुळे मेळाव्याद्वारे 500 पेक्षा अधिक पात्र उमेदवारांना नोकरीची हमखास संधी मिळणार आहे. १० वी, १२ वी, पदवीधर, आय.टी.आय, इंजिनिअर व इतर शैक्षणिक पात्रता असलेल्या तरुण तरुणींनी या रोजगार मेळाव्यात सहभागी व्हावे. मेळाव्याच्या ठिकाणीच संबंधित आस्थापनांकडून नोकरीवर हजर रहाण्याचे पत्र किंवा सूचना मिळू शकतात. त्यामुळे रोजगार मेळाव्याच्या दिवशी मुलाखतीच्या तयारीने यावे. सोबत आपला बायोडेटा तसेच इतर कागदपत्रांच्या मुळ प्रतिसह झेरॉक्स प्रती घेऊन तरुण तरुणींनी प्रत्यक्ष उपस्थित राहणे अनिवार्य आहे. Employment fair in Ratnagiri
जिल्ह्यातील नोकरीसाठी इच्छुकांनी या रोजगार मेळाव्यात सहभागी होऊन रोजगार संधीचा लाभ घ्यावा. रोजगार मेळाव्याविषयी अधिक माहितीकरिता दूरध्वनी क्रमांक ०२३५२ २२१४७८/२९९३८५ या क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन श्रीम. इनुजा शेख, सहायक आयुक्त, कौशल्य विकास रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्र, रत्नागिरी यांनी केले आहे. Employment fair in Ratnagiri
