रत्नागिरी, ता. 21: जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्र रत्नागिरी आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्यातर्फे महिलाकरिता रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. जिल्हयातील बेरोजगार उमेदवारांना विविध क्षेत्रातील रोजगारांच्या संधी उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने २७ जून २०२३ रोजी सकाळी १० वाजता शासकीय औदयोगिक प्रशिक्षण संस्था (मुलीची) नाचणे रोड, रत्नागिरी येथे आयजिन करण्यात आला आहे. Employment Fair for Women by Pandit Dindayal Upadhyay


या रोजगार मेळाव्याकरिता विविध खाजगी आस्थापनाकडून २०० हून अधिक रिक्त पदांची मागणी करण्यात आलेली आहे. तरी दहावी, बारावी, पदवीधर व इतर या शैक्षणिक पात्रता असलेल्या महिला उमेदवारांनी याचा लाभ घ्यावा. अशी विनंती करण्यात आली आहे. या रोजगार मेळाव्यामध्ये सहभागी होण्यासाठी नोंदणी केली नसल्यास कौशल्य विकास रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्र रत्नागिरी कार्यालयाकडे त्वरीत संपर्क साधून नोंदणी करावी, व रोजगार मेळाव्यात मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे, असे आवाहन श्रीम. इनुजा शेख सहायक आयुक्त, कौशल्य विकास रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्र रत्नागिरी यांचे मार्फत करण्यात येत आहे. Employment Fair for Women by Pandit Dindayal Upadhyay


अधिक माहीतीसाठी दुरध्वनी क्रमांक ०२३५२ – २२१४७८/२९९३८५ या क्रमांकावर संपर्क साधावा. Employment Fair for Women by Pandit Dindayal Upadhyay