रत्नागिरी, ता. 10 : शहरातील रा.भा.शिर्के प्रशाला, माळनाका येथे दि.12 फेब्रुवारी 2023 रोजी उद्योग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत व जिल्हा प्रशासनाद्वारे भव्य रोजगार मेळावा आयोजित करण्यात आले आहे. या मेळाव्यास रत्नागिरी जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात उमेदवार येणार आहेत. Employment fair at Ratnagiri

त्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची व त्यामुळे वाहतूक कोंडी होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यानुषंगाने जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी एम.देवेंदर सिंह यांनी मोटार वाहन अधिनियम 1988 चे कलम 115 नुसार प्राप्त अधिकारानुसार दि.12 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 8 वाजेपर्यंत कै. शामराव पेजे चौक, माळनाका ते स्वयंवर मंगल कार्यालय, माळनाका, रत्नागिरी हा रस्ता सर्व प्रकारच्या वाहनांच्या वाहतुकीकरिता बंद करण्यात येण्याचे तसेच पर्यायी मार्ग म्हणून रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती को-ऑपरेटिव्ह बँक, मराठा भवन ते स्वयंवर हॉल, रत्नागिरी या पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्याबाबतचे आदेश दिले आहेत. तरी नागरिकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. Employment fair at Ratnagiri

