पवार उद्यानविद्या महाविद्यालयातर्फे आयोजन
गुहागर, ता. 29 : तालुक्यातील पेवे खरेकोंड येथे २९ जुलै २०२२ रोजी स्वयंम रोजगार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शरदचंद्रजी पवार उद्यानविद्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यानी ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव कार्यक्रमाअंतर्गत करण्यात आला होता. यावेळी ग्रामस्थानी आपले मनोगत व्यक्त करताना स्व- रोजगारावर भर देण्याचा संकल्प केला. Employment camp at Peve Kharekond

यावेळी कृषिदूत जीवन सुकी, शमिन चव्हाण, वैभव गमरे, शुभम जाधव, श्रुतिक चाळके, आणि गावातील ग्रामस्थ विशेषत: महिला उपस्थित होत्या. असे एकूण २० ते २५ लोक आले होते. उद्यानविद्या महाविद्यालयच्या विध्यार्थ्यांनी जमलेल्या शेतकऱ्यांना स्व-रोजगार व त्याची गरज, तसेच फळप्रक्रिया, भाजीप्रक्रिया, सरकारच्या विविध योजना, उपक्रम या बद्दल माहिती दिली. या कार्यक्रमासाठी शरदचंद्रजी पवार उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य मा. डॉ. सुनीतकुमार पाटील तसेच प्राध्यापक मिथुन पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. ग्रामस्थानी आपले मनोगत व्यक्त करताना स्व- रोजगारावर भर देण्याचा संकल्प केला. Employment camp at Peve Kharekond

