गुहागर, ता. 29 : लोकनेते स्व.सदानंद आरेकर प्रतिष्ठान, गुहागर संचलित आरेकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट चिपळूण यांनी कोकणातील विद्यार्थ्यांना कौशल्य विकास आधारित कोर्स करून युवकांना रोजगार उपलब्ध व्हावे, यासाठी विविध नामांकित कंपन्यांशी संलग्न करार केला आहे. तरी विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा. Employment by Sadanand Arekar Pratishthan

आता विद्यार्थ्यांना कौशल्य विकास आधारित कोर्स करून नोकरीची उत्तम संधी मिळणार आहे. तसेच या कोर्सेसच्या फी मध्ये मोठ्या प्रमाणात सवलतही विद्यार्थ्यांना मिळणार आहे. महाराष्ट्र राज्यासह देशातील विविध हॉटेल, औद्योगिक कंपन्या, क्रूझ अश्या विविध क्षेत्राशी संलग्न असणाऱ्या कंपन्यांचा यामध्ये समावेश आहे. त्याचबरोबर रोजगार निमिर्ती साठी महिला भगिनींसाठी देखील कौशल्य विकास आधारित काही प्रशिक्षण कोर्सेस आहेत. जेणेकरून त्या त्या कोर्सेस च्या माध्यमातून महिलांना स्वावलंबी रोजगार निर्मिती करता येऊ शकते. अधिक माहितीसीठी संपर्क : 8483051399 / 8485851399, पत्ता : तहा हाइट्स, मुंबई-गोवा हायवे , चिपळूण शहर प्रांत ऑफिस शेजारी. Employment by Sadanand Arekar Pratishthan

गुहागरचे माजी सभापती स्व.सदानंद आरेकर साहेब यांच्या शतक महोत्सवी जयंती वर्षानिमित्त लोकनेते स्व.सदानंद आरेकर प्रतिष्ठान गुहागर या संस्थेची स्थापना करण्यात आली. या संस्थेच्या माध्यमातून गुहागर तालुक्यातील विविध जाती धर्मातील तरुणांना संघटित करून गेली ३ ते ४ वर्षे सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा आणि सांस्कृतिक अश्या विविध क्षेत्रात काम केले आहे.

