• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
15 February 2026, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

वेळणेश्वर महाविद्यालयात राष्ट्रीय परिषद संपन्न

by Ganesh Dhanawade
March 3, 2023
in Guhagar
84 1
0
Emerging Currents in Science and Technology

राष्ट्रीय परिषदेमध्ये सहभागी झालेले प्रशिक्षणार्थी

166
SHARES
473
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

विज्ञान व तंत्रज्ञानातील उदयोन्मुख प्रवाह या विषयावर

गुहागर, ता.03 : विद्या प्रसारक मंडळ, ठाणे संचलित महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालय, वेळणेश्वर (Maharshi Parashuram College of Engineering, Vevaneshwar) येथे राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त दोन दिवसांची राष्ट्रीय परिषद ‘विज्ञान व तंत्रज्ञानामधील  उदयोन्मुख प्रवाह’ या विषयावर पार पडली. या परिषदेमध्ये भारतातील विविध तज्ञ, भाभा अणुसंशोधन केंद्रातील ज्येष्ठ शास्त्रज्ञ, संशोधक, प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. Emerging Currents in Science and Technology

मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीप प्रज्वलनाने परिषदेची सुरुवात झाली. प्राचार्य डॉ. नरेंद्र सोनी यांनी स्वागत पर भाषण केले. परिषदेचे समन्वयक डॉ. अमितकुमार माने यांनी परिषद आयोजन करण्यामागचे हेतू व भारतातील संशोधन कार्य याबाबत विचार मांडले. संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ.विजय बेडेकर यांनी भारताच्या विकासामध्ये युवकांनी आपला सहभाग वाढविण्याचे आवाहन केले. प्रमुख पाहुणे डॉ. पंढरीनाथ घोंगे यांनी संशोधकांसाठी शिस्त व नीतिमत्ता आवश्यक आहे असे मत मांडले. Emerging Currents in Science and Technology

तज्ञांच्या व्याख्यानामध्ये डॉ. सुधाकर आगरकर यांनी स्टीम पासून सेन्सर पर्यंतच्या विविध औद्योगिक क्रांतीच्या सामाजिक व आर्थिक परिणाम विशद केला. त्यानंतर डॉ. पंढरीनाथ घोंगे यांनी संशोधकांसाठी आधुनिक तंत्रज्ञानामध्ये असणारी आव्हाने व संधी यांचा उलगडा केला. तमिळनाडू येथील डॉ. संथनम यांनी तंत्रज्ञानामधील गणिताचा वापर व गणिताच्या प्रगतीसाठी लागणारे तंत्रज्ञान या दोघांचा उलगडा केला. भाभा अणुसंशोधन केंद्रातील चार ज्येष्ठ शास्त्रज्ञांनी यावेळी आपले संशोधन सादर केले. यामध्ये श्री.जयंत कयाल यांनी ओरिगामीचा विज्ञान व तंत्रज्ञानातील वापर व श्री. शर्मा यांनी भारताची ऊर्जेची गरज, ऊर्जा निर्मिती साधने व आव्हाने या विषयावर आपले संशोधन सादर केले. श्री.कारखानीस यांनी सप्लाय चेन मॅनेजमेंट व श्री. गोळे यांनी उपकरणीय शास्त्रातील संशोधनाची नवी दिशा या विषयावर संशोधन सादर केले. Emerging Currents in Science and Technology

https://ayurzeal.com/
मणक्यांच्या आजारावर प्रभावशाली उपचार, संपर्कासाठी इथे क्लिक करा.

परिषदेच्या दुसऱ्या दिवशी अभियांत्रिकीच्या शेवटच्या वर्षातील विद्यार्थ्यांनी आपले शोधनिबंध सादर केले. याबरोबरच काही संशोधक विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने आपले शोधनिबंध सादर केले. परिषदेच्या सांगता समारोपासाठी संस्थेचे सचिव श्री. अभय मराठे उपस्थित होते. त्यांनी संशोधन निरंतर प्रक्रिया असून विद्यार्थ्यांनी उदयोन्मुख प्रवाह वर जास्त लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले. या परिषदेमध्ये सादर झालेले शोधनिबंध पुस्तक स्वरूपात प्रकाशित करणार असल्याचे ग्रंथपाल श्री. संतोष चतुर्भुज यांनी सांगितले. Emerging Currents in Science and Technology

परिषदेच्या आयोजनामध्ये माजी संचालिका डॉ. कीर्ती आगाशे, प्राचार्य डॉ.सोनी, उपप्राचार्य प्रा.पवार यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी करण्यासाठी डॉ.अमित माने, प्रा.पाटकर प्रा. सरगर प्रा.दांडेकर, श्री.गोखले, श्री.लोहार, श्री.जाधव, श्री.शेवडे व श्री.जांभळे यांनी योगदान दिले. या परिषदेचे सूत्रसंचालन डॉ. दिवे यांनी केले. Emerging Currents in Science and Technology

Tags: Emerging Currents in Science and TechnologyGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share66SendTweet42
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.