लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती
गुहागर, ता. 05 : श्रीदेव गो. कृ. माध्यमिक विद्या मंदिर, स. सु. पाटील विज्ञान, श्री म . ज . भोसले वाणिज्य व कै विष्णूपंत पवार कनिष्ठ महाविद्यालय गुहागर येथे लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धा प्राथमिक व माध्यमिक गटात घेण्यात आल्या. या स्पर्धेत विद्यार्थ्यानी मोठया संख्येने सहभाग घेतला होता. Eloquent competition held in Guhagar School

यावेळी विद्यालयाचे मा. मुख्याध्यापक श्री. कांबळे सर यांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. श्री कतकर सर यांनी लोकमान्य टिळक यांच्या विषयी आपले विचार मांडले. मा . मुख्याध्यापक कांबळे सर, पर्यवेक्षक गंगावणे सर व प्रमुख पाहुणे माजी मुख्याध्यापक श्री एम एम ढेरे सर यांच्या उपस्थितीत या स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. यावेळी मराठी भाषा विभागाच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे, स्पर्धक विद्यार्थ्याचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. विभाग प्रमुख श्री पी बी जाधव सर यांनी स्पर्धकांना मूल्यमापन निकष व नियम सांगितले. Eloquent competition held in Guhagar School
या स्पर्धेत प्राथमिक गटात प्रथम क्रमांक – कु.दुर्वा दशरथ नाटेकर, ५वी अ द्वितीय क्रमांक – कु.स्वरा मंगेश पाटील, ७ वी ब तर तृतीय क्रमांक – कु.शौनक नितीन दीक्षित, ५वी अ यांनी संपादन केले. आणि माध्यमिक गटात प्रथम क्रमांक ( विभागून ) कु. सोनल शशिकांत महाजन व कु. ओम दिपक देवकर, द्वितीय क्रमांक – कु. प्रांजल प्रशांत गोयथळे तर तृतीय ( विभागून ) कु. शर्वरी जनार्दन देवकर व कु. समर्था मंदार मोरे यांनी संपादन केले. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून श्री पी बी जाधव सर, सौ एस एस ठाकूर मॅडम, सौ.उत्कर्षा तांबट-कांबळे मॅडम, सौ. ज्योती माने मॅडम यांनी केले. Eloquent competition held in Guhagar School

सर्व यशस्वी विद्यार्थ्याचे शाळा समिती अध्यक्ष श्री दिपकजी कनगुटकर यांच्या वतीने तसेच संस्था व शाळेच्यावतीने हार्दिक अभिनंदन करण्यात आले. यावेळी पर्यवेक्षिका सौ. सुजाता कांबळे मॅडम व इतर शिक्षक वृंद उपस्थित होते. Eloquent competition held in Guhagar School
