प्रदूषण नियंत्रण यंत्रणेचा भार ग्राहकांच्या माथी
गुहागर, ता. 28 : औष्णिक प्रकल्पातून वीजनिर्मिती करताना बाहेर पडणाऱ्या सल्फर डायऑक्साईडचे प्रमाण कमी करण्यासाठी केंद्र सरकारने फ्लू गॅस डिसल्फरायझेशन यंत्रणा बसवणे बंधनकारक केले आहे. सदरची एफजीडी यंत्रणा बसवण्यासाठी महानिर्मितीला तब्बल 5 हजार कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. सदरचा खर्च वीज ग्राहकांकडून वसूल करण्यासाठी एमईआरसीने परवानगी दिली आहे. त्यामुळे महानिर्मितीच्या प्रतियुनिट विजेचा दर तब्बल 30 पैशांनी वाढणार असून तो सर्वसामान्य ग्राहकांच्या माथी बसणार आहे. Electricity tariff will increase by 30 paise

महानिर्मितीची औष्णिक वीज निर्मिती क्षमता 10 हजार मेगावॅटच्या घरात आहे. सदर वीज प्रकल्पांमध्ये एफजीडी यंत्रणा बसवणे केंद्र सरकारने बंधनकारक केले आहे. सदरची यंत्रणा बसवण्यासाठी प्रतिमेगावॅटमागे तब्बल 75 लाख रुपयांचा खर्च आहे. महानिर्मितीने पहिल्या टप्प्यात कोराडी, खापरखेडा आणि पारस वीज पेंद्रातील सुमारे 1130 मेगावॅट क्षमतेच्या पाच संचांमध्ये एफजीडी यंत्रणा उभारण्याचे काम सुरू केले आहे. त्याला सुमारे 850 कोटी रुपये खर्च येणार आहे. Electricity tariff will increase by 30 paise
तसेच सर्व वीज केंद्रांमध्ये एफजीडी यंत्रणा पुढील दोन वर्षांत बसवणे बंधनकारक आहे. त्यासाठी पाच हजार कोटी रुपये एवढा प्रचंड खर्च येणार आहे. त्यामुळे प्रतियुनिट विजेच्या दरात मोठी वाढ होणार असल्याने आधीच महागडय़ा वीज दरामुळे मेटाकुटीला आलेल्या ग्राहकांच्या खिशाला कात्री लागणार आहे. Electricity tariff will increase by 30 paise
