• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
17 December 2025, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

घरावरील विद्युत वाहिन्या हटवण्यात याव्यात

by Manoj Bavdhankar
May 8, 2025
in Guhagar
142 1
0
Electrical lines on the house should be removed
279
SHARES
796
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

वाकी येथील पांडुरंग सोलकर यांचे निवेदन

गुहागर, ता. 08 : तालुक्यातील वाकी येथील रहिवासी पांडुरंग सोलकर यांच्या घरावरून विद्युत वाहिन्या घराला चिकटलेल्या अवस्थेत आहेत. या विद्युत वाहिन्यांमुळे जीवितहानी  होण्याची शक्यता असल्याने या विद्युत वाहिन्या महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनी यांनी लवकरच काढाव्यात, अशी मागणी केली आहे. Electrical lines on the house should be removed

पांडुरंग सोलकर त्यांनी निवेदनात म्हटले आहे की, सप्टेंबर २०२४ मध्ये माझ्या घरावरून जाणाऱ्या थ्री फेज तारांमुळे माझ्या संपूर्ण घरामध्ये शॉक आला होता. याबाबत मी महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनी शृंगारतळी कार्यालयाकडे संपर्क साधला असता त्यांनी तात्पुरत्या स्वरूपात विद्युत वाहिन्या खेचून दिल्या होत्या. त्यानंतर दोन विद्युत पोलांच्या दरम्यान एक एक विद्युत पोल टाकण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार जानेवारी २०२५ मध्ये दरम्यान महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे कर्मचारी एक जमिनीमध्ये खड्डा खणून निघून गेले. तेव्हापासून आजपर्यंत विद्युत मंडळ कंपनीकडून कोणत्याही प्रकारचे काम करण्यात आलेले नाही. याबाबत संबंधित कार्यालयांकडे पांडुरंग सोलकर यांनी वारंवार विचारणा करूनही कोणतीच दखल घेतली नाही. दरम्यान सद्यस्थितीत विद्युत वाहिन्यांच्या लोड मुळे विद्युत पोल पुन्हा वाकले असून पांडुरंग सोलकर यांच्या घरावरील व अंगणावरील विद्युत तारा अजून खाली आलेल्या आहेत. सदरील विद्युत तारांमुळे आमच्या व गावातील लोकांच्या जीवाला धोका निर्माण झाला असून येथे नवीन विद्युत पोल बसवावे व होणारी जीवित हानी टाळावी, असे म्हटले आहे. Electrical lines on the house should be removed

Tags: Electrical lines on the house should be removedGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share112SendTweet70
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.