रत्नागिरी, ता. 07 : रत्नागिरी जिल्ह्यातील ४ एसटी डेपोमध्ये लवकरच १३३ इलेक्ट्रीक बस दाखल होणार आहेत. या गाड्या दापोली, खेड, चिपळूण आणि रत्नागिरी तालुक्यात सुरु केल्या जाणार आहेत. Electric buses launched in Ratnagiri district

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कमी खर्चाच्या आणि चांगली सेवा देणाऱ्या १३३ इलेक्ट्रीक गाड्या लवकरच दाखल होणार असून काही गाड्या १२ मीटर तर काही गाड्या ९ मीटर लांबीच्या असणार आहेत. या सर्व गाड्या इलेक्ट्रीक असुन काही गाड्या चार्ज गेल्यानंतर २०० कि मी तर काही गाड्या ३०० किमी चालतील अशा बनविण्यात आल्या आहेत. तसेच या सर्व गाड्या वातानुकूलित ठेवल्या जाणार असून त्याचा प्रवाशांना चांगला फायदा होणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली, खेड, चिपळूण आणि रत्नागिरी तालुक्यात या गाड्या सुरु केल्या जाणार आहेत. Electric buses launched in Ratnagiri district
