गुहागर, ता. 19 : गुहागर विधानसभा मतदार संघासाठी गुहागर, खेड व चिपळूण येथे होणाऱ्या 322 मतदान केंद्रासाठी निवडणूक यंत्र यंत्रणा सज्ज झाली आहेत. तसेच ही प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी चौक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध ठिकाणी सखी मतदान केंद्र दिव्यांगासाठी विशेष सोयी सुविधा असलेल्या दिव्यांग मतदान केंद्र युवा व आदर्श मतदान केंद्र करून या मतदान केंद्र विशेष सजावट करून मतदारांचे स्वागत करण्यात येणार आहे. Election system ready for voting process

