भाजपच्या शिष्टमंडळाने राज्य निवडणूक आयुक्तांची घेतली भेट
मुंबई, ता. 12 : राज्यात अतिवृष्टीमुळे (Heavy Rain) ठिकठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. राजकीय पक्षांना निवडणूक अर्ज दाखल करणे, प्रचार करणे आणि मतदारांनी मतदान करणे अवघड होणार आहे. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने (Election commision of Maharashtra ) २० जुलै ते १८ ऑगस्ट या कालावधीत जाहीर केलेला निवडणूक कार्यक्रम पुढे ढकलावा. Election should be postponed अशी मागणी भाजपच्या (BJP) शिष्ट मंडळाने राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांना केली आहे. Election should be postponed
तीन दिवसांपूर्वी राज्य निवडणूक आयोगाने २० जुलै ते १८ ऑगस्ट या कालावधीत ९२ नगर परिषदा, ४ नगर पंचायती व १५ ग्रामपंचायतींमधील निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. या निवडणुका पुढे ढकलाव्यात अशी मागणी करण्यासाठी भाजपच्या (BJP) शिष्टमंडळाने सोमवारी (ता. 11) मुंबईत राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांची भेट घेतली. यावेळी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, राम शिंदे, जयकुमार रावल, सुनील कर्जतकर, चंद्रशेखर बावनकुळे व सदाभाऊ खोत आदी उपस्थित होते. Election should be postponed
Election should be postponed
त्यानंतर पत्रकारांशी बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले की, राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी राजकीय आरक्षणाशिवाय (OBC Reservation) झाल्यातर 5 वर्ष ओबीसांना आरक्षणाला मुकावे लागेल. निवडणुका पुढे ढकलल्यास ओबीसी आरक्षण पुन्हा लागू करण्यासाठी वेळ मिळेल. ओबीसी राजकीय आरक्षणातच निवडणूका व्हाव्यात. यासाठी भाजप आग्रही आहे. राज्य निवडणूक आयोगाने दोन दिवसांपूर्वी अचानक ९२ नगरपालिका ४ नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर केल्या. त्यानुसार २० जुलै ते १८ ऑगस्ट या कालावधी निवडणूक कार्यक्रम असेल. हा सर्व पावसाचा कालावधी आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर करताना पावसाचा अंदाज घ्यावा. असे सर्वोच्च न्यायालयाने निकालात म्हटले आहे. आयोगाने पावसाच्या आकडेवारीचा विचार केला असला तरी वस्तुस्थितीचा विचार करावा. असे आमचे म्हणणे आहे. सध्या राज्यात अतिवृष्टीमुळे ठिकठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. निवडणूक होणाऱ्या सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, अमरावती, बुलढाणा व पुणे इत्यादी १७ जिल्ह्यात बऱ्याच नद्या अतिवृष्टीमुळे ओसंडून वाहत आहेत. काही ठिकाणी धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे राजकीय पक्षांना निवडणूक अर्ज दाखल करणे. उमेदवारांनी प्रचार करणे. मतदारांनी मतदान करणे अवघड होणार आहे. त्यामुळे आयोगाने हा निवडणूक कार्यक्रम पुढे ढकलावा. अशी विनंती आम्ही केली. मा. राज्य निवडणूक आयुक्तांनी याबाबत फेर आढावा घेण्याचे आश्वासन दिले आहे. Election should be postponed