• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
15 February 2026, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागर तालुका शिवसेना सचिव पदी संतोष आग्रे यांची निवड

by Ganesh Dhanawade
March 13, 2023
in Guhagar
145 1
0
Election of Taluka Shiv Sena Secretary Agre

शिवसेना तालुका सचिव पदाचे नियुक्ती पत्र प्रदान करताना जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, सोबत महिला जिल्हा संघटक रश्मी गोखले, उप जिल्हाप्रमुख प्रभाकर शिर्के, तालुकाप्रमुख दिपक कनगुटकर

284
SHARES
812
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता.13 : गुहागर तालुका शिवसेनेच्या सचिव पदी माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांचे समर्थक असणारे संतोष आग्रे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आग्रे हे कट्टर शिवसैनिक माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. माजी मंत्री रामदासभाई कदम यांच्या २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत संतोष आग्रे प्रचाराची धुरा सांभाळली होती. आ. भास्करराव जाधव यांच्या सोबतही त्यांनी पक्षाचे काम केले आहे. Election of Taluka Shiv Sena Secretary Agre

रत्नागिरीच्या पालकमंत्री पदी उदय सामंत यांची निवड झाल्यानंतर जिल्ह्यात अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केला. आता निवडणूक आयोगानेही एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निकाल दिला आहे. शिवसेना व धनुष्य बाण हे शिंदेकडे यांच्याकडेच राहिल्याने राज्यासह जिल्हा व तालुक्यात कार्यकर्त्यांचा प्रवेश करण्याचा ओढा वाढला आहे. गुहागर तालुक्यात तालुकाध्यक्ष दिपक कनगुटकर यांच्या मार्गदर्शनाखाली संघटना वाढत आहे. पालकमंत्री उदय सामंत यांनी नुकतीच तालुका सचिव संतोष आग्रे यांची नियुक्ती केली. आग्रे हे कट्टर शिवसैनिक माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. माजी मंत्री रामदासभाई कदम यांच्या २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत संतोष आग्रे प्रचाराची धुरा सांभाळली होती. आ. भास्करराव जाधव यांच्या सोबतही त्यांनी पक्षाचे काम केले आहे. त्यांचा राजकारणातील अनुभवाचा फायदा हा शिंदे गटाच्या शिवसेनेला नक्कीच होणार आहे. जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण यांनी आग्रे यांना सचिव पदाचे नियुक्ती पत्र प्रदान केले. Election of Taluka Shiv Sena Secretary Agre

या नियुक्ती पत्रानंतर बोलताना श्री. आग्रे म्हणाले की, पक्षाने माझ्यावर जो विश्वास टाकला तो येत्या काळात सार्थ ठरवू. तसेच शिवसेना तालुक्याच्या प्रत्येक घरघरात पोचविण्याचे काम करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. Election of Taluka Shiv Sena Secretary Agre

यावेळी महिला जिल्हा संघटक रश्मी गोखले, उप जिल्हाप्रमुख प्रभाकर शिर्के, तालुकाप्रमुख दिपक कनगुटकर, युवा तालुका प्रमुख रोहन भोसले, अरदिप परचुरे, तालुका संघटक प्रल्हाद विचारे, जेष्ट शिवसैनिक आत्माराम मोरे, सुशिल आग्रे, गुहागर शहरप्रमुख निलेश मोरे, राजु धामणस्कर, सुभाष काजरोळकर,अरुण भुवड, नरेश पवार, संदिप भोसले, उमेश किल्लेकर, जय काजरोलकर व सर्व पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते. Election of Taluka Shiv Sena Secretary Agre

Tags: Election of Taluka Shiv Sena Secretary AgreGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share114SendTweet71
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.