रत्नागिरी, ता.22 : महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली आहे. यामुळे कोकणातून सहकारतज्ज्ञ अॅड. दीपक पटवर्धन सलग दुसऱ्यांदा फेडरेशनचे संचालक झाले आहेत. कोकणातून ते एकमेव संचालक आहेत. यावेळी पतसंस्थांचे प्रश्न मांडणे, सोडवणे आणि सहकार रुजवण्याकरिता कोकणात प्रयत्न करणार असल्याचे अॅड. पटवर्धन यांनी सांगितले. Election of credit institution unopposed
फेडरेशनचे विद्यमान अध्यक्ष काकासाहेब कोयटे आणि सहकार भारतीचे राष्ट्रीय महामंत्री उदय जोशी यांच्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाली. फेडरेशनच्या २१ जागांसाठी अध्यक्ष काकासाहेब कोयटे व सहकार भारतीचे उदय जोशी यांच्या नेतृत्वाखाली सहकार समृद्धी पॅनेलच्या २१ जणांसह एकूण ३२ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. सर्वसाधारण प्रवर्गातून १६ जागांसाठी २० अर्ज होते. हे अतिरिक्त चार अर्ज बुधवारी (ता. २१) माघारीच्या अंतिम दिवशी मागे घेतले गेल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली. Election of credit institution unopposed
अॅड. पटवर्धन हे गेली तीस ते पस्तीस वर्षे सहकार क्षेत्रात कार्यरत आहेत. रत्नागिरीतील स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष आहेत. रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत सलग चार वेळा संचालक आहेत. मध्यवर्ती बँकेवरही बिनविरोध निवड झाली होती. आता राज्यस्तरावरही बिनविरोध निवड झाल्याने त्यांचे कार्यक्षेत्र विस्तारल्याचे स्पष्ट होत आहे. महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह हौसिंग फायनान्स कॉर्पोरेशनचे संचालक, रत्नागिरी जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष, रत्नागिरी जिल्हा हौसिंग सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष आहेत. Election of credit institution unopposed
अॅड. दीपक पटवर्धन यांचे विशेष अभिनंदन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे, सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण, आमदार प्रसाद लाड, भाजपचे नेते प्रवीण दरेकर आणि उदय जोशी यांनी केले. Election of credit institution unopposed
बिनविरोध उमेदवार :
ओमप्रकाश तथा काकासाहेब कोयटे (अहमदनगर), वसंत शिंदे (मुंबई), राधेश्याम चांडक (बुलडाणा), दादाराव तुपकर (जालना), डॉ. शांतीलाल सिंगी (औरंगाबाद), शशिकांत राजोबा (सांगली), चंद्रकांत वंजारी (ठाणे), अॅड. दीपक पटवर्धन (रत्नागिरी), धनंजय तांबेकर (नांदेड), रवींद्र भोसले (सातारा), जवाहर छाबडा (कोल्हापूर), भास्कर बांगर (पुणे), वासुदेव काळे (अहमदनगर), सुभाष आकरे (गोंदिया), नीलिमा बावणे (नागपूर), नारायण वाजे (नाशिक), राजुदास जाधव (यवतमाळ), सुरेश पाटील (रायगड), अॅड. अंजली पाटील (नाशिक), भारती मुथा (पुणे) व शरद जाधव (पालघर). Election of credit institution unopposed

