गुहागर, ता. 20 : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आशीर्वादाने, गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. महाराष्ट्र राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर, रत्नागिरी जिल्हा संपर्क अध्यक्ष सतीश नारकर , गुहागर मनसे तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी, गुहागर मनसे तालुका अध्यक्ष विनोद जानवळकर यांच्या मार्गदर्शनाखाली व कौंढर काळसूर गावचे युवा अध्यक्ष समीर जोयशी व मनसे सैनिक औदुंबर कदम यांच्या वतीने जे विद्यार्थी बौद्धिकदृष्टा सक्षम आहेत. अशा विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केले. हा कार्यक्रम नुकताच कोकण रत्न हॉटेल शृंगारतळी येथे घेण्यात आला. Educational material on behalf of MNS
या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गुहागर तालुकाध्यक्ष विनोद जानवळकर, सामर्थ्य संस्थेचे प्रज्ञा धामणस्कर , मनसे सैनिक प्रसाद कुष्टे, सागर शिरगावकर , प्रवीण गांधी, वृषाली मोहिते, संदीप डावल, दत्ताराम पिंपळकर आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी तालुक्यातील सक्षम असणारे व गरीब व गरजू असणारे विद्यार्थ्यांमध्ये अभिजीत मोहिते ( वरवेली मोडका आगर), श्रावणी डावल ( तळवली), सायली पिंपळकर, ( वडद सुतारवाडी,) सलोनी मांडवकर (वडद काजूवाडी) या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. Educational material on behalf of MNS
यावेळी बोलताना मनसे गुहागर तालुकाध्यक्ष विनोद जानवलकर यांनी सांगितले की, तालुक्यातील अनेक गोरगरीब व गरजू विद्यार्थ्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शैक्षणिक तसेच इतर आर्थिक मदत करण्यात आली आहे. यापुढेही हुशार व गरीब असलेल्या विद्यार्थ्यांसाठी जास्तीत जास्त शैक्षणिक साहित्य व आर्थिक मदत करण्याचा प्रयत्न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात येईल. गुहागर तालुक्यामध्ये आर्थिक दृष्ट्या गरीब व गरजू असलेल्या विद्यार्थ्यांनी त्वरित संपर्क साधावा. असे आवाहनही यावेळी विनोद जानवलकर यांनी केले. यावेळी सामर्थ्य संस्था च्या प्रज्ञा धामणस्कर यांनी सर्व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त करून यापुढेही गोरगरीब विद्यार्थी व जनतेसाठी आपल्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनसे सैनिक सागर शिरगावकर यांनी केले. Educational material on behalf of MNS