100 वा मन की बात कार्यक्रम दाखवणार मोठ्या पडद्यावर
गुहागर, ता. 29 : बेढी पढाव साठी काम करणाऱ्या दुर्गादेवी देवस्थानतर्फे यावर्षी 125 मुलींना शिक्षणासाठी मदत करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 100 व्या मन की बात कार्यक्रमाचे वेळीच बेढी पढाव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती श्री दुर्गादेवी देवस्थानचे अध्यक्ष किरण खरे यांनी दिली. Educational help for girls by Durga Devi Devasthan
बेटी पढाव अभियानात काम करताना गेली 6 वर्ष दुर्गादेवी देवस्थानतर्फे गरीब मुलींच्या शिक्षणासाठी मदत करत आहे. आजपर्यंत 800 हून अधिक मुलींचा एका वर्षाचा शैक्षणिक खर्च दुर्गादेवी देवस्थानने उचलला आहे. मनाली भोबस्कर हीला सांगीतिक शिक्षणासाठी सलग पाच वर्ष आर्थिक मदत केली आहे. ग्रामीण भागातील मुली शिकल्या पाहिजेत या उद्देश्याने या वर्षीही मंदिर जीर्णोद्धार वर्धापन दिनाचे निमित्ताने 125 मुलींची निवड पुढील शैक्षणिक वर्षासाठी करण्यात आली आहे. गुहागर तालुक्यातील वाकी, पिंपळवट, वेलदूर, आरेगांव, गुहागर, असगोली, पालशेत, हेदवी, नरवण, पिंपर, मासू, कर्दे, चिंद्रावळे, पाभरे, शिवने, पाटपन्हाळे, खोडदे, शीर, कोतळूक, आदी ग्रामीण भागातील मुलींची निवड श्री दुर्गादेवी देवस्थानने केली आहे. Educational help for girls by Durga Devi Devasthan
30 एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा 100 वा मन की बात कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाचे औचित्य साधून 125 मुलींना शैक्षणिक मदत आणि त्यांच्या मातांचा साडी चोळी देवून सन्मान करण्याचे श्री दुर्गादेवी देवस्थानने निश्चित केले आहे. 30 एप्रिलला दुपारी 11 ते 12 या वेळात मन की बात हा कार्यक्रम मोठ्या पडद्यावर दाखविण्यात येणार आहे. त्यानंतर भाजपच्या महामंत्री ॲड. माधवी नाईक, भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा सौ. निलम गोंधळी यांच्या उपस्थित मुली आणि मातांचा सन्मान करण्यात येणार आहे. यावेळी उत्तर रत्नागिरी जिल्हा भाजप ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष संतोष जैतापकर, तालुकाध्यक्ष नीलेश सुर्वे उपस्थित रहाणार आहेत. संपूर्ण कार्यक्रमाचे संचालन दुर्गादेवी देवस्थानच्या महिला विश्र्वस्त करणार आहेत. अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष किरण खरे यांनी दिली. Educational help for girls by Durga Devi Devasthan