• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
15 August 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

कोकणातील गरजू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक मदतीचा संकल्प

by Manoj Bavdhankar
July 21, 2026
in Maharashtra
211 2
0
Educational assistance for needy students in Konkan
414
SHARES
1.2k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

विद्यादान सहाय्यक मंडळ व विभा अरविंद ग्रंथालयाचा संयुक्त उपक्रम

गुहागर, ता. 21 : विद्यादान सहाय्यक मंडळ आणि विभा अरविंद ग्रंथालय, चिपळूण यांच्या संयुक्त विद्यमाने कोकणातील होतकरू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना उच्च व व्यावसायिक शिक्षणासाठी मदत करण्याचा महत्त्वपूर्ण संकल्प करण्यात आला. यासंदर्भातील बैठक नुकतीच विभा अरविंद ग्रंथालयाच्या कार्यालयात पार पडली. Educational assistance for needy students in Konkan

या बैठकीला सुप्रसिद्ध त्वचारोगतज्ज्ञ डॉ. यतिन जाधव, डी.बी.जे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव बापट आणि लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष चंद्रकांत कुलकर्णी मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. शिक्षण हे समाजपरिवर्तनाचे प्रभावी माध्यम असून आर्थिक अडचणींमुळे एकाही विद्यार्थ्याचे शिक्षण थांबू नये, यासाठी समाजातील दानशूर व्यक्ती, संस्था आणि संघटनांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन डॉ. जाधव यांनी केले. या उपक्रमांतर्गत शिष्यवृत्ती, शैक्षणिक साहित्य वाटप, करिअर मार्गदर्शन आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन यांसारखे उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीला सामाजिक कार्यकर्ते अनिल कलकुटकी, डॉ. प्रविण चव्हाण, सई वरवाटकर, पूर्वा करोडे, प्रदीप पवार, सचिन नानिस्कर, सुमित सागवेकर, सिताराम पडते तसेच उद्योजक प्रशांत पाटेकर उपस्थित होते. Educational assistance for needy students in Konkan

गरजू व गुणवंत विद्यार्थ्यांनी शैक्षणिक मदतीसाठी सुमित सागवेकर (मो. ९०८२०८९६२८) किंवा स्मिता मैदनकर (मो. ९७०२९५५४६४) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले. अभियांत्रिकी, वैद्यकीय, नर्सिंग, फार्मसी, आयटी तसेच इतर व्यावसायिक शिक्षणासाठी आवश्यक ते सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असा विश्वास विद्यादान सहाय्यक मंडळाच्या कोकण चॅप्टरने व्यक्त केला. Educational assistance for needy students in Konkan

Tags: Educational assistance for needy students in KonkanGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share166SendTweet104
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.