गुहागर, ता. 30 : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा आरे भंडारवाडा मध्ये शिक्षण परिषद केंद्रप्रमुख डॉ मनोज पाटील यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली. सदर शिक्षण परिषदेला माजी सभापतीचे अध्यक्ष सुरेश दादा सावंत, सरपंच समीर घाणेकर, उपसरपंच भोसले मॅडम, मिलिंद सुर्वे, प्रतिष्ठित नागरिक मोरे मॅडम सर्व शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते. Education Conference at Aare Bhandarwada School
यावेळी मित्र उपक्रम अंतर्गत विपश्यना आनापान कार्यक्रमाविषयी मथुवेल गावित सर यांनी मार्गदर्शन केले. शाळेमध्ये मित्र उपक्रम आनापान कार्यक्रम दहा मिनिटे दररोज घ्यावयाचा असून त्यामुळे विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती व एकाग्रता वाढीस लागणार आहे. तसेच त्यांना अभ्यासाबाबत खूप फायदा होणार आहे असे त्याने सांगितले. त्यानंतर शाळा व्यवस्थापन समिती पुनर्रचना पुनर्गठण याविषयी असगोली नं. 2 शाळेच्या शिक्षिका प्रियंका शिंदे मॅडम यांनी शाळा व्यवस्थापन समिती रचनेसाठी विविध निकष शाळा व्यवस्थापन समितीचे कार्यपद्धती रचना महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले. Education Conference at Aare Bhandarwada School

आंधळे सर यांनी जयंत नारळीकर गणित अध्ययन समृद्धी कार्यक्रम याविषयी माहिती सांगितली. धुमाळ सर यांनी शैक्षणिक समस्या व नाविन्यपूर्ण उपक्रम याविषयी सविस्तर माहिती विशद केली. सर्व शिक्षकांचा सक्रिय सहभाग घेतला. अन्नपूर्णा विद्यालयाचे श्री संजय गमरे यांनी अध्ययन निष्पत्ती वर आधारित नियोजन याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. केंद्रप्रमुख डॉ मनोज पाटील यांनी शैक्षणिक व प्रशासकीय कामकाजाचा आढावा घेतला. आरे भंडारवाडा शाळेचे मुख्याध्यापक वाघ, शिक्षक देशमुख, माजी मुख्याध्यापिका गणेशकर मॅडम यांनी शिक्षण परिषद यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले. Education Conference at Aare Bhandarwada School
