रत्नागिरी, ता. 14 : रत्नागिरी- कोल्हापूर महामार्गावरील हातखंबा गुरववाडी येथे आज मंगळवारी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास माती वाहतूक करणाऱ्या डंपरने समोरून येणाऱ्या टेम्पोला जोरदार धडक दिली. या अपघातात टेम्पोतील दोघेजण जखमी झाले आहेत. यातील एकाला गंभीर दुखापत झाली आहे. Dumper hits tempo at Hatkhamba
रत्नागिरीतून निघालेला (गाडी क्रमांक MH 09 FL 4068) टेम्पो चालक निलेश साळुंखे (वय ३०, रा. नांद्रे ता. मिरज, सांगली) आणि गणेश कोळी (वय ३०, रा. नांद्रे ता. मिरज, सांगली) हे दोघेही मिरजच्या दिशेने प्रवास करीत होते. हातखंबा गुरववाडी येथे डंपरने विरुद्ध दिशेला जाऊन टेम्पोला जोरदार धडक दिली. अपघातग्रस्त डंपर हा पालीतून रत्नागिरीच्या दिशेने मार्गक्रमण करत होता. या डंपरमध्ये ओवर लोड माती भरलेली होती. डंपर चालकाने विरुद्ध दिशेला जाऊन टेम्पोला जोरदार धडक दिल्याने अपघात झाला. ही धडक इतकी जोराची होती की, डंपर धडकलाही आणि टेम्पोवरच पलटीही झाला. या अपघातात टेम्पो चालक निलेश साळुंखे व गणेश कोळी हे दोघेजण आतमध्येच अडकले. Dumper hits tempo at Hatkhamba
अपघात झाल्यानंतर डंपर चालक घटनास्थळावरून काही क्षणात पळून गेल्याचे समजते. टेम्पोत अडकलेल्या गणेश कोळी यांच्या डाव्या पायाला गंभीर दुखापत झालेली असून टेम्पोचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान अपघात झाल्याची माहिती मिळताच श्री जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज नाणीज धाम येथील रुग्णवाहिकेचे चालक बाळू केतकर यांच्यासह हातखंबा टॅबवरील वाहतूक पोलीस घटनास्थळी पोहोचले. टेम्पोत अडकलेल्या दोघांनाही स्थानिकांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. जखमींना रुग्णवाहिकेतून उपचारांसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. वाहतूक पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला करून ठप्प झालेली वाहतूक सुरळीत केली. Dumper hits tempo at Hatkhamba