अंमली पदार्थ वाळवीसारखा युवा पिढीला पोखरतआहे. तर त्याच्या व्यापारातून येणारा पैसा दहशतवादाला पोसत आहे. ; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह
नवी दिल्ली, ता. 27 : केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी आज गुजरातची राजधानी गांधीनगरमध्ये “अंमली पदार्थांची तस्करी आणि राष्ट्रीय सुरक्षा” या विषयावरील एका उच्चस्तरीय प्रादेशिक बैठकीचे अध्यक्षपद भूषवले. या बैठकीला गोवा, गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान या राज्यांचे आणि केंद्रशासित प्रदेश दादरा आणि नगर हवेली तसेच दमण आणि दीव राज्याचे मुख्यमंत्री / उपमुख्यमंत्री / प्रशासकांसह केंद्र सरकार आणि राज्य सरकारांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. Drug trafficking and national security
यावेळी उपस्थितांना संबोधित करताना, केन्द्रीय गृहमंत्री म्हणाले की आपल्या संविधानाने कायदा आणि सुव्यवस्था हा राज्यांचा विषय बनवला आहे आणि हे योग्य देखील आहे. मात्र, गेल्या चार दशकांत अशा प्रकारचे अनेक वेगवेगळे गुन्ह्यांचे प्रकार अस्तित्वात आले आहेत, ज्यांचे स्वरुप केवळ राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय देखील आहे. याचे उदाहरण म्हणजे अंमली पदार्थांची तस्करी आणि प्रसार. गुन्ह्याचा हा प्रकार देशाच्या सीमेपलीकडून आपल्या देशावर लादला गेलेला प्रकार आहे आणि देशाच्या सीमांच्या आत आंतरराजीय टोळ्यांच्या माध्यमातून तो लहान लहान शहरे, गावे आणि पाड्यांपर्यंत पोहोचला आहे आणि आपल्या तरुण पिढीला उद्ध्वस्त करत आहे. Drug trafficking and national security
कायदा आणि सुव्यवस्था राज्यांच्या अखत्यारितला विषय असून देखील जर आपण सीमेपलीकडे लढण्याचा दृष्टीकोन बाळगला नाही तर यावर नियंत्रण करू शकणार नाही. म्हणूनच सर्व राज्यांचे पोलिस आणि नार्कोटिक्स विभागाच्या सर्व संस्था, भारत सरकारचा महसूल, समाज कल्याण, आरोग्य विभाग आणि सीमा सुरक्षेचे काम करणारी सीएपीएफ, तटरक्षक दल यांसारखी दले आणि नौदल यांच्यात व्यापक समन्वय निर्माण करून जर आपण धोरण तयार केले नाही तर या समस्येचे समूळ उच्चाटन करणे अशक्य आहे. म्हणूनच मोदी जींच्या नेतृत्वाखाली 2019 पासून एका दृष्टीकोनाचा अवलंब केला आहे की ज्यामध्ये समन्वय आणि सहकार्याच्या आधारावर अंमली पदार्थांच्या विरोधात आपल्या लढाईला पुरेशा प्रमाणात मज़बूत करणे, परिणामकारक बनवणे आणि यशस्वी बनवणे यांचा अंतर्भाव आहे. ते म्हणाले की अशा प्रकारच्या प्रादेशिक संमेलनांनंतर जिल्हास्तरीय एन्कॉर्ड ची स्थापना झाली आहे आणि एफएसएलचा वापर देखील वाढला आहे. राज्यांच्या उच्च न्यायालयात राज्य प्रशासनांकडून विशेष न्यायालयांची अनुमती मागण्याची संख्या देखील वाढली आहे. Drug trafficking and national security
श्री अमित शाह म्हणाले की, एकीकडे अंमली पदार्थ वाळवीसारखा आपल्या युवा पिढीला पोखरून संपवत आहेत आणि दुसरीकडे अंमली पदार्थांच्या व्यापारातून येणारा पैसा दहशतवादाला देखील पोसत आहे. ते म्हणाले की देशाच्या युवा पिढ़ीला सुरक्षित ठेवण्याच्या आणि दहशतवादाच्या अर्थपुरवठ्यावर कठोर आघात करण्याच्या दृष्टीने या लढाईला भारत सरकारच्या सर्व संस्था, राज्य सरकारच्या सर्व संस्था आणि पोलिसांनी एकत्रित लढाई मानून लढले पाहिजे आणि विजय प्राप्त केला पाहिजे. Drug trafficking and national security
अंमली पदार्थांच्या विरोधातील लढाईमध्ये भारत आज अतिशय नाजूक आणि महत्त्वाच्या वळणावर आहे आणि जर आपण एकाच धोरणाने लढा दिला तर आपण विजयी होऊ शकतो; पण आपण वेगवेगळे होऊन हा एक सामान्य गुन्हा मानून चाललो तर अंमली पदार्थांच्या जाळ्याचे सूत्रधार विजयी होतील, असा इशारा त्यांनी दिला. अमित शाह म्हणाले की देशाच्या स्वातंत्र्याच्या या अमृत महोत्सवी वर्षात पंतप्रधान नरेन्द्र मोदीजी यांनी‘नशा-मुक्त भारत’ बनवण्याचे जे लक्ष्य आपल्या समोर ठेवले आहे त्यात आपल्याला यश मिळवायचेच आहे आणि याच दिशेने केन्द्रीय गृह मंत्रालय आणि भारत सरकारच्या सर्व संस्था एकजुटीने काम करत आहेत. त्यांनी सांगितले की देशाच्या स्वातंत्र्याच्या 75व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने 75 दिवसांमध्ये 75 हजार किलो अंमली पदार्थ नष्ट करण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले होते. मात्र, पंतप्रधान नरेन्द्र मोदी जी यांच्या नेतृत्वाखाली वेळेआधीच केवळ 60 दिवसांमध्ये हे लक्ष्य साध्य करण्यात आले. Drug trafficking and national security
आज या विशेष अभियानात NCB दिल्ली, NCB अह्मदाबाद आणि गुजरात पोलिसांकडून सुमारे 1864 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ नष्ट करण्यात येत आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. याबरोबरच आतापर्यंत सुमारे 1 लाख 65 हजार किलोग्राम जप्त अंमली पदार्थ नष्ट करण्यात आले आहेत. केन्द्रीय गृहमंत्री म्हणाले की NCB सर्व राज्यांच्या अंमली पदार्थ विरोधी कृती दलांच्या समन्वयाने अंमली पदार्थ जप्त करण्यात आणि ते नष्ट करण्यामध्ये अग्रणी भूमिका बजावत आहेत जेणेकरून पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांचा नशामुक्त भारताचा संकल्प साकार करता येईल. पंतप्रधान नरेन्द्र मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली गृह मंत्रालयाने अंमली पदार्थांविरोधात शून्य सहनशीलतेच्या धोरणाचा अवलंब केला आहे, असे ते म्हणाले. शाह यांनी पुढे सांगितले की पंतप्रधान मोदी यांच्या निर्देशांवरून गृह मंत्रालयाने अंमली पदार्थांवर अंकुश ठेवण्यासाठी संस्थात्मक संरचनेची मजबुती, सर्व नार्को संस्थांचे सक्षमीकरण आणि समन्वय आणि विस्तृत जागरूकता या अभियानाचा त्रिसूत्रीय फॉर्म्युल्याचा अंगिकार केला आहे. Drug trafficking and national security
अमित शाह म्हणाले की अंमली पदार्थांविरोधातील लढाईत प्रभावी कामगिरी करण्यासाठी मोदी सरकारने ‘Whole of Government Approach’अंतर्गत आंतर विभागीय समन्वयावर सातत्याने भर दिला आहे ज्याचे अल्पावधीतच यशस्वी परिणाम दिसत आहेत आणि 2014 नंतर अंमली पदार्थांचे साठे पकडण्याच्या आणि जप्त करण्याच्या प्रमाणात झालेली वाढ हा त्याचा पुरावा आहे. देशात अंमली पदार्थांच्या वितरणाच्या जाळ्याला उद्ध्वस्त करण्याच्या धोरणाचे यश या ठिकाणी दिसत आहे. Drug trafficking and national security