रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी
रत्नागिरी, ता. 15 : मागील काही दिवसांमध्ये रत्नागिरी जिल्ह्यात काही इसम अंमली पदार्थाची खरेदी – विक्री करत आहेत अशी माहिती मिळत होती. त्या अनुषंगाने रत्नागिरी शहरात अंमली पदार्थ विरोधी कारवाई करण्याचे सूचना जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. धनंजय कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी, रत्नागिरी उपविभाग श्री. सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी, पोलीस निरीक्षक श्री. विनीत चौधरी यांनी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी/अंमलदार यांना देण्यात आलेल्या होत्या. त्याप्रमाणे रोज निहाय अंमली पदार्थ खरेदी विक्री करणाऱ्यांबाबत गोपनीय माहिती प्राप्त करण्याचे काम चालू होते. Drug traffickers jailed
दिनांक 14/05/2023 रोजी 02.00 वा. च्या दरम्याने रत्नागिरी शहर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस उपनिरीक्षक श्री. आकाश साळुंखे व पोलीस अंमलदार हे रत्नागिरी रेल्वे स्टेशन येथील पार्सल गेट मधून पार्किंग कडे जाणाऱ्या रोडवर पायी पेट्रोलिंग करीत जात असताना रत्नागिरी शहर पोलीस ठाणे गुन्हे अभिलेखावरील असलेले, माहितगार गुन्हेगार संदिप गोविंद शिवगण, रा. धनजीनाका रत्नागिरी, आकीब खालीद काझी रा. गवळीवाडा रत्नागिरी व तौसिफ आसिफ मिरजकर रा. राहुल कॉलनी गवळीवाडा, रत्नागिरीत हे तिघे एकत्रीत संशयास्पद हालचाल करत असताना दिसून आल्याने त्यांना जागीच थांबवून त्यांची पंचांचे समक्ष चौकशी व अंग झडती घेण्यात आली. Drug traffickers jailed
या तीनही संशयीत इसमांचे अंगझडती मधून व घटनास्थळी एकूण 21.78 ग्रॅम ब्राऊन हेरॉईन हा अंमली सदृश पदार्थ विक्री करण्याचे उद्देशाने गैरकायदा स्वतःच्या जवळ बाळगल्या स्थितीत मिळून आला. म्हणून त्यांना ताब्यात घेऊन त्यांचे विरुद्ध रत्नागिरी शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि.नं. 128/2023 एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम 8(क), 22 (ब), व 29 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास सुरू आहे. Drug traffickers jailed
ही कारवाई, रत्नागिरी शहर पोलीस ठाणे, गुन्हे प्रकटीकरण पथकातील श्री. आकाश साळुंखे, पोलीस उप निरीक्षक, श्री. प्रसाद घोसाळे, पोहेकाँ/615, श्री. गणेश सावंत, पोहेकाँ/306, श्री. प्रविण बर्गे, पोहेकाँ/1239, श्री. अमोल भोसले, पोहेकाँ/1399, श्री. आशिष भालेकर, पोना/1112, श्री. विनय मनवल, पोना/1273, श्री. रत्नकांत शिंदे, पोना/1526 व श्री. पंकज पडेलकर, पोना/1447 या पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे. Drug traffickers jailed