डॉ. दाभोळे : ग्रामीण रुग्णालयात बांधकामाला सुरवात
गुहागर, ता. 21 : भारत सरकाराच्या संरक्षण मंत्रालय अंतर्गत काम करणाऱ्या संशोधन आणि विकास संस्थेतर्फे देशातील 500 ठिकाणी वैद्यकिय ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. त्यापैकी एक ऑक्सिजन प्रकल्प गुहागर शहरातील ग्रामीण रुग्णालयात उभा रहात आहे. हे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण एनएचएआय आणि एचएलएल इन्फ्राच्या वतीने करण्यात येणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यात मंडणगड, खेड आणि रत्नागिरीमध्ये असेच आणखी तीन ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभे रहाणार आहेत.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत संपूर्ण देशात ऑक्सिजनचा तुटवडा भासू लागला. त्यामुळे तिसरी लाट येण्यापूर्वी प्रत्येक तालुक्यात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्याचा संकल्प केंद्र सरकारने केला आहे. विविध संस्थांच्या माध्यमातून प्रकल्प उभारणीचे काम सुरु आहे. भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयांतर्गत संशोधन आणि विकास संस्था (DRDO) काम करते. या संस्थेने वैद्यकिय क्षेत्रासाठी लागणाऱ्या ऑक्सिजन निर्मिती करणारा छोटा प्रकल्प संशोधनातून तयार केला. आता या तंत्रज्ञानाद्वारे तयार होणारे ऑक्सिजन प्रकल्प देशातील ग्रामीण, डोंगराळ भागातील शासकीय रुग्णालयात बसविण्यात येत आहेत. महाराष्ट्रातील 28 ठिकाणी हा प्रकल्प उभा करण्यासाठी आवश्यक असणारे बांधकाम आणि इलेक्ट्रीफिकेशन करुन देण्याची जबाबदारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने घेतली आहे.
गुहागरमधील ग्रामीण रुग्णालयाच्या परिसरातील तालुका वैद्यकिय अधिकारी कार्यालयाच्या जून्या इमारतीचे ठिकाणी हा प्रकल्प उभा करण्यात येत आहे. मुंबई गोवा महामार्गाचे काम करणाऱ्या एका ठेकेदाराकडे हे काम सोपविण्यात आले आहे. त्याने कामाला सुरवातही केली आहे. पायाभरणीचे काम पूर्ण झाल्यावर प्रत्यक्ष ऑक्सिजन प्रकल्प बसविण्याचे काम भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयांतर्गत वैद्यकिय क्षेत्रात पायाभूत सुविधांची उभारणी करणारी एचएलएल इन्फ्राटेक सर्व्हिसेस ही संस्था करणार आहे. हा ऑक्सिजन प्रकल्पातून प्रति मिनिट 100 लिटर ऑक्सिजन तयार होईल. जो एकाचवेळी प्रति मिनिट 5 लिटर क्षमतेने 19 रुग्णांना आपण देवू शकतो. किंवा 19 सिलेंटरमध्ये भरुन ठेवू शकतो. आज ग्रामीण रुग्णालयाला रोज ऑक्सिजन आणण्यासाठी लोटे एमआयडीसीमध्ये रुग्णवाहिका पाठवावी लागते. या प्रकल्पामुळे हा खर्च वाचेल. रुग्णवाहिका मोकळी राहील. गुहागर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि रेनबो सारख्या अन्य रुग्णालयांना देखील आम्ही ऑक्सिजन पुरवू शकु. त्यातून भविष्यात रुग्णालयाचा महसुलही वाढु शकतो. या प्रकल्पामुळे आपण ऑक्सिजनच्या बाबतीत आत्मनिर्भर होणार आहोत. अशी माहिती वैद्यकिय अधिक्षक डॉ. जयंत दाभोळे यांनी दिली.
Medical Oxygen Generation Projects will be set up at 500 locations across the country by a Defence Research and Development Organisation of the Ministry of Defense, Government of India. One oxygen project is set up at Rural Hospital in Guhagar. This work will be done on behalf of the National Highways Authority India (NHAI) and HLL Infra. In the Ratnagiri district, three more such oxygen generation plants will be set up at Mandangad, Khed, and Ratnagiri.
The second wave of corona caused a shortage of oxygen throughout the country. Therefore, before the third wave, the central government has decided to set up oxygen generation plants in every taluka. The DRDO developed a small oxygen project for the medical field through research. Oxygen projects generated by this technology are now being installed in government hospitals in rural, hilly areas of the country. In Maharashtra National Highway Authority India (NHAI) has undertaken 28 Projects to carry out the construction and electrification required.
संबंधित बातम्या
ग्रामीण रुग्णालयातील व्हेंटिलेटर तांत्रिक कारणांमुळे क्रियान्वित नाही