पाकिस्तानला संवेदनशील माहिती पुरवल्याचा संशय?
गुहागर ता. 07 : देशाच्या सुरक्षेला धोका पोहोचवेल अशी संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरवल्याप्रकरणी पुण्यातील संरक्षण संशोधन संस्थेच्या (DRDO) संचालकाला एटीएसने अटक केली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. DRDO director arrested by ATS
संरक्षण संशोधन संस्था डीआरडीओच्या संचालकाने हनीट्रॅपमध्ये अडकून संवेदनशील माहिती पाकिस्तानच्या इंटेलिजन्स ऑफिसरला दिल्याचा संशय आहे. निवृत्तीला ६ महिने राहिले असताना ते हनीट्रॅपमध्ये फसले असल्याचे बोलले जात आहे. हे संचालक मोबाईलच्या माध्यमातून पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणेशी संबंधित महिलेच्या संपर्कात होते, अशी माहिती समोर आली आहे. DRDO director arrested by ATS


हे संचालक पुणे येथील त्यांच्या कार्यालयामधून पाकिस्तान इंटेलिजन्स ऑपरेटीव्हच्या हस्तकाशी व्हॉट्सअँप व्हाईस मेसेज आणि व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनी पदाचा गैरवापर करत त्यांच्या ताब्यात असलेली संवेदनशील शासकिय माहिती पाकिस्तानला पुरवल्याचा संशय आहे. याप्रकरणी त्यांना दहशतवाद विरोधी पथकाने ताब्यात घेतले आहे. DRDO director arrested by ATS
मिळालेल्या माहितीनुसार, डी.आर.डी.ओ.चे हे संचालक पुणे येथील त्यांच्या कार्यालयामध्ये शासकीय कर्तव्य बजावत असताना भारताचे शत्रू राष्ट्र असलेल्या पाकिस्तानच्या इंटेलिजन्स ऑपरेटीव्हच्या हस्तकाशी संपर्कात होते. सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हॉटअँपद्वारे व्हाईस मेसेज आणि व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून ते पाकिस्तानच्या हस्तकाच्या संपर्कात राहिले. डी.आर.डी.ओ.च्या या संचालकाने पदाचा गैरवापर करत कर्तव्यावर असताना त्यांच्याकडे असलेली आणि भारताच्या सुरक्षिततेला धोका पोहचू शकेल अशी संवेदनशील माहिती शत्रु राष्ट्राला अनधिकृतरित्या पुरवली. असे तपासात आढळून आल्याने त्यांना महाराष्ट्र राज्य पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने अटक केली आहे. DRDO director arrested by ATS