लोकसहभागातून काम पूर्णत्वास, नाम फाऊंडेशनचे सहकार्य
गुहागर, ता. 27 : तालुक्यातील चिखली कदमवाडी ते साळवीवाडी या नाल्याचे रुंदीकरण व गाळ उपसा या कामाचा शुभारंभ नुकताच करण्यात आला. लोकसहभागातून सुरु झालेल्या या उपक्रमाला नाम फाऊंडेशनचे सहकार्य लाभले आहे. Drain widening through public participation at Chikhli

चिखली येथे नाला रुंदीकरणाचे काम बरीच वर्षे प्रस्तावीत होते. तसेच मोठ्या प्रमाणात गाळही भरला होता. ही खर्चिक बाब असल्याने या कामाला थोडा विलंब होत होता. अखेर या कामाचे नियोजन करण्यात येऊन लोकसहभागातून या कामाला सुरुवात करण्यात आली. हा उपक्रम राबविण्यासाठी २०२१ पासून तुळसीदास साळवी व विजय भाऊ साळवी यांचा पाठपुरावा सुरु होता. त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले आहे. Drain widening through public participation at Chikhli

या कार्यक्रमाला नाम फाऊंडेशनचे कोकण विभाग प्रमुख समीर जानवळकर, टीडब्ल्यू जे. फाऊंडेशनचे पोमेंडकर, तालुका कृषी अधिकारी अमोल क्षिरसागर, पी. एम. गवारी, गुहागर महावितरणचे उपकार्यकारी अभियंता गणेश गलांडे, ग्रामसेवक एस. डी. जाधव, ग्रामीण पाणीपुरवठा समितीचे विभूती आदवडे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते. Drain widening through public participation at Chikhli
