डॉ. विनय नातूंकडून विरोधकांचा समाचार, रामपूर गटात गावभेट झंझावती दौरा सुरु
गुहागर, ता. 20 : गेली 15 वर्षे आमदार, स्वतः मंत्री व अडीच वर्षे सत्ता असतानादेखील गुढे-डुगवे रस्त्याचे काम विरोधकांना करता आले नाही. आता अचानक रास्ता रोको करुन येथील जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून सुरु असून हे रास्ता रोको आंदोलन म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा असल्याची टीका माजी आमदार डॉ. विनय नातू यांनी केली आहे. Dr. Natu visit to the village begins
रामपूर गटामध्ये डॉ. विनय नातू यांचा गावभेट दौरा सुरु आहे. या पार्श्वभूमीवर तेथील लोकांशी ते संवाद साधून विकासाचे प्रश्न जाणून घेऊन ते सोडविण्यासाठी प्रयत्नशील असल्याची ग्वाही देऊन विरोधकांवर कडाडून टीका करत आहेत. केवळ नकला करणे, दुसऱ्यांना नावे ठेवणे हे उद्योग विरोधकांकडून सुरु आहेत. लोकांची दिशाभूल करुन विकासाचे प्रश्न सुटत नाहीत. रामपूर भागात महायुतीकडून रस्त्यांची कामे सुरु असताना केवळ गुढे-डुगवे रस्त्याच्या दुरुस्तीवरुन विरोधक सरकारची बदनामी करत आहेत. गेल्या 5 वर्षात या रस्त्यासाठी त्यांच्याकडून का प्रयत्न झाले नाहीत. केवळ 1 कि. मी. चे रस्ते करायचे आणि संपूर्ण रस्ता केल्याचे कागदोपत्री दाखवायचे असे खोटे प्रकार गुढे-डुगवे रस्त्याच्या बाबतीत झालेले आहेत. आता पंचक्रोशीतील जनता जेव्हा प्रश्न विचारायला लागली तेव्हा ही रस्ता रोकोची नौटंकी त्यांनी केली. मात्र, येथील जनता आता त्यांना पुरती ओळखूनअसून विरोधकांच्या पायाखालील जमीन सरकरत असल्यानेच त्यांच्याकडून अशा आंदोलनाचा फार्स केला जात असल्याचा आरोप डॉ. नातू यांनी केला आहे. Dr. Natu visit to the village begins
सध्या रामपूर गटातील कौंढरताम्हाने, बोरगाव, गोंधळे, बामणोली, वाघीवरे आदी गावांचा डॉ. नातू यांचा भेट दौरा सुरु आहे. या दौऱ्यात नातू तेथील ग्रामस्थांशी संवाद साधत आहेत. गुहागर मतदारसंघाला विकासाच्या बाबतीत खूप पुढे घेऊन जायचे आहे, अशी ग्वाही देऊन राज्य सरकार व केंद्र सरकार यांनी जाहीर केलेल्या लोकोपयोगी योजनांची माहिती देऊन त्याचा लाभ घेण्याचे आवाहन डॉ. नातू यांनी केले आहे. नातू यांच्या या गावभेट दौऱ्याला ग्रामस्थांचा उस्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. Dr. Natu visit to the village begins