• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
9 November 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

डाँ. बाबासाहेब आंबेडकर जयंती विशेष

by Guhagar News
April 14, 2023
in Maharashtra
64 1
0
Dr. Babasaheb Ambedkar Jayanti Special

डाँ. बाबासाहेब आंबेडकर

126
SHARES
359
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

आंबेडकरांना शाळेत बसणे दूरच; पाणी पिण्याचीही नव्हती परवानगी; खडतर होता प्रवास

गुहागर, ता. 14 : मुंबई- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना शालेय जीवनात एका भीषण परिस्थितीचा सामना करावा लागला होता. शाळेतील भेदभाव आणि अस्पृश्यतेमुळे ते दिवसभर पाणी पिऊ शकत नव्हते. त्यांना दिवसभर तहानलेलं राहावं लागत होतं. आंबेडकरांनी त्यांच्या आत्मचरित्रात असंही लिहिलं आहे की, कनिष्ट जात असल्यामुळे त्यांना शाळेत पाणी पिऊ दिले जात नव्हते. अशा परिस्थितीत ते शाळेत असेपर्यंत बिनापाण्याचे राहत होते. Dr. Babasaheb Ambedkar Jayanti Special

डाँ. आंबेडकरांचे वडील रामजी मालोजी सकपाळ आणि आई भीमाबाई हे हिंदू महार जातीचे होते, जे त्या काळात अस्पृश्य मानले जात होते. कबीरपंथाशी संबंध असूनही, त्यांनी आपल्या मुलांना हिंदू ग्रंथ वाचण्यासाठी नेहमीच प्रोत्साहन दिले. आंबेडकर हिंदू धर्माच्या आदर्शवादी आणि आध्यात्मिक विचारांनी खूप प्रभावित होते. परंतु, जेव्हा ते सरकारी शाळेत शिकायला गेले तेव्हा त्यांना त्यांच्या जातीसाठी सामाजिक विरोध आणि अस्पृश्यता पाहून खूप वाईट वाटायचे. Dr. Babasaheb Ambedkar Jayanti Special

आंबेडकर अभ्यासात खूप हुशार होते. पण केवळ ते खालच्या जातीचे होते म्हणून त्यांना आणि त्यांच्यासारख्या खालच्या जातीतील इतर अस्पृश्य मुलांना शाळेत वर्गाबाहेर वेगळे बसवले गेले. त्यांना वर्गात येण्यास परवानगी नव्हती. बहुतेक शिक्षकांनी या अस्पृश्य मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष दिले नाही किंवा त्यांना मदत केली नाही. अस्पृश्यता आणि भेदभावाची अमानुष वागणूक एवढी होती की, जेव्हा अस्पृश्य मुलांना तहान लागायची तेव्हा शाळेतील शिपाई किंवा इतर उच्चवर्णीय व्यक्ती त्यांच्या हातावर उंचावरून पाणी सोडत आणि त्यांना पाणी द्यायचे. कारण त्यांना ना पाणी मिळायचे, ना भांड्याला स्पर्श करण्याची परवानगी होती. असे केल्याने पाणी आणि भांडी अशुद्ध होतील अशी सर्वांची समजूत होती. अस्पृश्य मुलांना पाणी देण्याचे काम शाळेतील शिपाई करत असे. त्यांच्या अनुपस्थितीत अस्पृश्य मुलांना अनेकदा पाण्याविना तहानलेलं राहवं लागत होतं. Dr. Babasaheb Ambedkar Jayanti Special

1920 मध्ये डॉ. आंबेडकर लंडनहून बॅरिस्टर म्हणून परतले. 1926 मध्ये ते मुंबई विधान परिषदेचे सदस्यही झाले. तोपर्यंत त्यांनी सामाजिक कार्य आणि राजकारणात सक्रिय सहभाग घ्यायला सुरुवात केली होती. बाबासाहेबांनी आपल्या समाजाला सांगितले की, सार्वजनिक ठिकाणी पाणी पिणे हा मूलभूत अधिकार आहे. 1923 मध्ये, मुंबई विधानपरिषदेने असा ठराव संमत केला की अस्पृश्यांनाही सरकारने तयार केलेल्या आणि राखलेल्या तलावांचे पाणी पिण्याची परवानगी आहे. 1924 मध्ये महाड नगरपरिषदेनेही त्याची अंमलबजावणी करण्याचा ठराव केला. तरीही स्थानिक सवर्ण हिंदूंच्या विरोधामुळे अस्पृश्यांना पाणी पिण्याची परवानगी नव्हती. दलितांमध्ये त्यांच्या मानवी हक्कांसाठी जागरुकता निर्माण करणे हा बाबासाहेबांचा उद्देश होता. आपला अस्पृश्य समाज या तलावाचे पाणी पिणार असे त्यांनी ठरवले. Dr. Babasaheb Ambedkar Jayanti Special

त्यासाठी दोन महिन्यांपूर्वी परिषद बोलावण्यात आली होती. 20 मार्च 1927 रोजी आम्ही या तलावाचे पाणी पिऊ, असे गावोगावी लोकांना निरोप पाठवण्यात आले. संमेलनात बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यांच्या जमावासमोर एक दमदार भाषण केले की, आपल्याला घाण राहायचे नाही, स्वच्छ कपडे घालायचे आहे, मेलेल्या प्राण्याचे मांस खायचे नाही. आम्हीही माणूस आहोत आणि इतर मानवांप्रमाणेच आपल्यालाही सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. त्या काळी महाराष्ट्रातील कोकण भागातील महाड शहरातील चवदार तलावात आंघोळ करण्याचा आणि पाणी पिण्याचा अधिकार फक्त उच्चवर्णीयांनाच होता. या तलावाचे पाणी पिऊन आम्ही अमर होणार नाही, पण हे पाणी पिण्याचा आपलाही हक्क आहे हे दाखवून देऊ, असे आंबेडकर म्हणाले. या तलावातून बाहेरचा माणूस किंवा प्राणी पिऊ शकतो, मग आम्हाला का थांबवलं जातंय? बाबासाहेबांनी या चळवळीची तुलना फ्रेंच क्रांतीशी केली. भाषणानंतर डॉ. आंबेडकर हजारो अनुयायांसह चवदार तलावा ठिकाणी जाऊन पाणी प्याले. Dr. Babasaheb Ambedkar Jayanti Special

डाँ. आंबेडकरांवर मार्टिन ल्यूथर किंगचा खूप प्रभाव होता. ल्युथरने अमेरिकेतही अशीच चळवळ केली. काळ्या लोकांना सर्व रस्त्यांवर चालण्याचा अधिकार असायला हवा, असे ते म्हणाले. त्यांना सर्व बसमध्ये प्रवास करण्याचा, कोणत्याही रेस्टॉरंटमध्ये जाण्याचा आणि सर्व सार्वजनिक शाळांमध्ये शिक्षण घेण्याचा अधिकार असावा. यासाठी मार्टिन ल्यूथरने ऑगस्ट 1963 मध्ये एक पदयात्रा केली, ज्याला वॉशिंग्टन मार्च म्हणून ओळखले जाते. तेथे त्यांनी त्यांचे प्रसिद्ध भाषण दिले – ‘माझे एक स्वप्न आहे.’ मार्टिन ल्यूथर किंगच्या या भाषणाची तुलना बाबासाहेबांच्या महाड सत्याग्रहाच्या वेळी केलेल्या भाषणाशी करता येईल. Dr. Babasaheb Ambedkar Jayanti Special

Tags: Dr. Babasaheb Ambedkar Jayanti SpecialGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share50SendTweet32
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.