गोवा, ता. 10 : बऱ्याचदा आधुनिक पद्धतीने बनविलेली उपकरणे जीवाला अपायकारक ठरू शकतात. पूर्वी बसस्थानकांवर प्रवाशांना बसण्यासाठी लाकडी बाकडे असायचे; पण आता स्टीलची बाकडे बसविली आहेत. मात्र, बसण्यासाठी तयार केलेल्या या बाकड्यांवर कुणी झोपायचा प्रयत्न करू नये, असा संदेश रविवारी घडलेल्या घटनेतून दिला गेला. Doolki made the ambush
फोंड्यातील जुन्या बसस्थानकावरील स्टीलच्या निवारा शेडमध्ये (रविवारी) दुपारी एक चाळीस वर्षीय प्रवासी येऊन बसला. रविवार असल्याने प्रवाशांची संख्याही जेमतेम… वाढता उकाडा. त्यातच दुपारची वेळ. त्यामुळे बिचाऱ्याला लागली डुलकी. झोपेच्या तंद्रीतच त्याने त्या स्टीलच्या बाकड्यावरच ताणून दिली. पण गाढ झोपेत तो प्रवासी बाकड्यावरून घरंगळत कलंडला आणि त्याचे डोके बाकड्याच्या मध्ये असलेल्या एका फटीत अडकले. डोके फटीत सापडल्यानंतर खडबडून जागे झालेल्या प्रवाशाने कसेबसे उठण्याचा प्रयत्न केला. पण त्याला काही केल्या उठताच येईना, डोके बाकाखाली अडकलेले आणि शरीर बाहेर, अशी त्याची स्थिती झालेली. Doolki made the ambush
अर्धा तास तो बाकड्याखाली अडकलेल्या अवस्थेतच होता. इतर प्रवाशांनी प्रवाशाला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला; पण तो अयशस्वी ठरला. शेवटी कुणी तरी फोंड्यातील अग्निशामक दलाला फोन केल्यामुळे जवानांनी घटनास्थळी धाव घेतली आणि स्टीलचे बाकडे कटरने कापून त्याला बाहेर काढले. अग्निशामक दलाचे यशवंत गावस यांच्या मार्गदर्शनाखाली देविदास बायेकर, वामन गावडे, प्रमोद गावडे, योगेश वेलिंगकर यांनी त्या प्रवाशाला बाहेर काढले. मात्र, त्यामुळे बसण्यासाठी बसविलेल्या बाकड्यांवर कुणी झोपू नये. Doolki made the ambush