कोकणातील उद्योजकांना अर्थसहाय्य करण्याचे आवाहन
चिपळूण, ता. 11 : येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या वतीने आयोजित केलेल्या ५, ६, ७, ८ फेब्रुवारी २०२३ दरम्यान संपन्न होणाऱ्या पर्यटन लोककला सांस्कृतिक खाद्य महोत्सवाला रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने अडीच लाख रुपयांची देणगी दिली आहे. बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे व बँकेचे सरव्यवस्थापक अजय चव्हाण यांच्या हस्ते धनादेश वाचनालयाला देण्यात आला आहे. Donation from Bank to Folk Art Festival
यावेळी बोलताना डॉ. तानाजीराव चोरगे म्हणाले की, ‘लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर आयोजित करीत असलेल्या पर्यटन लोककला सांस्कृतिक खाद्य महोत्सव सारखे कार्यक्रम होणे ही गौरवाची गोष्ट आहे. अशा कार्यक्रमांना सर्वानीच सहकार्याचा हातभार लावायला हवा. रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही ‘लोटिस्मा’ला नेहमीच सहकार्य करते. म्हणून महोत्सवासाठी बँकेने दोन लाख पन्नास हजार रुपयांची देणगी दिली आहे. महोत्सवाला तीस लाख रुपयाहून अधिक खर्च येणार आहे. कोकणातील उद्योजकांनी यासाठी अर्थसहाय्य करायला हवे अशी भावना रत्नागिरी जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांनी व्यक्त केली. Donation from Bank to Folk Art Festival

या महोत्सवाच्या संयोजन समितीचे अध्यक्षपद डॉ. तानाजीराव चोरगे यांनी स्वीकारले आहे. तसेच महोत्सवाचे स्वागताध्यक्ष रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत आणि डॉ. चोरगे हा महोत्सव यशस्वी व्हावा, यासाठी प्रयत्नशील आहेत. Donation from Bank to Folk Art Festival

