• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
15 February 2026, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

खातू मसाले तर्फे कॅन्सरवरील संशोधनासाठी देणगी

by Ganesh Dhanawade
March 16, 2023
in Guhagar
94 1
0
Donation for Cancer Research by Khatu Masala
184
SHARES
527
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

सैनिकांच्या कल्याणासाठीही; सलग दुसऱ्या वर्षीहि जपली सामाजिक बांधिलकी

गुहागर, ता. 16 : कोकणातील सुप्रसिद्ध पाटपन्हाळे येथील मे खातू मसाले उद्योग समूहाने देशाच्या सीमेवर लढणाऱ्या, वीरमरण आलेल्या सैनिकांच्या कल्याणासाठी कर्तव्य म्हणून १ लाख रुपयांची देणगी आणि कॅन्सरवरील संशोधनासाठी 50 हजारांची देणगी दिली आहे. खातू परिवाराने सलग दुसऱ्या वर्षीहि आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे. Donation for Cancer Research by Khatu Masala

या देणगी बाबत मे खातू मसाले उद्योगचे संस्थापक शाळीग्राम खातू म्हणाले की, एकदा आमच्या कंपनीत आयकर विभागाचे अधिकारी तपासणीसाठी आले होते. त्यांचे काम संपल्यावर गप्पा मारत असताना देशासाठी लढणारे जवान, त्यांची कुटुंबे, वीरमरण आलेल्या जवानाच्या कुटुंबाचे नंतरचे जीवन या विषयावर चर्चा झाली. छोट्या मोठ्या उद्योजकांनी शासनाला कर देताना काही रक्कम सैनिक कल्याण निधीला दिली तर त्याचा उपयोग कशापध्दतीने सैनिकांच्या कुटुंबाना होतो. याचा अनुभव एका अधिकाऱ्याने सांगितला. त्याचवेळी आपणही आपल्या उद्योगाला भराव्या लागणाऱ्या कराच्या काही टक्के रक्कम देशहिताच्या कामाला देणगी स्वरुपात दिली पाहिजे. असा निश्चय केला. याबाबत मुलगा शैलेंद्र, सूरज, पत्नी प्रतिभा यांच्याशी चर्चा केली. तसेच आमचे आर्थिक सल्लागार दत्ते यांनी देखील होकार दिला. त्याचवेळी सैनिक कल्याण निधी बरोबर आरोग्य क्षेत्रालाही काही रक्कम द्यावी अशी चर्चा झाली. Donation for Cancer Research by Khatu Masala

आजही टाटा स्मारक केंद्रातर्फे कॅन्सरवरील उपचारांसाठी संशोधन सुरु आहे. या संशोधनाला साह्य करण्याचे आम्ही निश्चित केले. त्याप्रमाणे आर्मी सेंट्रल वेलफेअर फंडाला रु. 1 लाखाची आणि टाटा स्मारक केंद्राला 50 हजाराची देणगी आम्ही थेट बँकतर्फे पाठवली. इमेल द्वारे अशी देणगी पाठवत असल्याचे त्यांना कळवले. खातू मसाले उद्योग समूहातर्फे सामाजिक कार्यात हातभार असतो. केवळ स्वतःच्या नाही तर कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा देखील विमा उतरविण्यात आला आहे. तसेच दरवर्षी कामगारांना प्रोत्साहनपर आर्थिक रक्कमेच्या बक्षीसही दिले जाते. खातू मसाले उद्योगाच्या या सामाजिक कार्याचे कौतुक केले जात आहे. Donation for Cancer Research by Khatu Masala

Tags: Donation for Cancer Research by Khatu MasalaGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share74SendTweet46
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.