चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी मंडळाकडून दहा हजार रु. रोख रक्कम
रत्नागिरी, ता. 28 : मराठा मंदिर संस्था संचालित अ. के. देसाई हायस्कूलला अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळाने दहा हजार रुपयांची देणगी दिली. फारशा देणग्यांची सवय नसल्याने अनाहूनतपणे हायस्कूलला मिळालेल्या या देणगीमुळे शाळेने आनंद व्यक्त केला. Donation by Chitpawan Mandal


अ. के. देसाई हायस्कूलमधील काही विद्यार्थी हे सर्वसाधारण कुटुंबातील असतात. हे विद्यार्थी हुषार असतात. परंतु काही वेळा त्यांना शैक्षणिक प्रगतीसाठी पाठबळ मिळाले की, त्यांनाही पुढे संधी मिळते. मंडळाच्या देणगीबद्दल मुख्याध्यापक प्रमोद शेखर यांनी आभार मानले. देसाई हायस्कूलला मिळालेल्या देणगीचा आम्ही विद्यार्थ्यांसाठी उपयोग करू, अशी ग्वाही दिली. या वेळी चित्पावन मंडळाचे कार्यवाह राजेंद्र पटवर्धन, कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी, अनंत आगाशे, मोहन पटवर्धन, शिक्षिका अंजली पिलणकर, वृषाली सावंत, संतोष गार्डी आदी उपस्थित होते. Donation by Chitpawan Mandal

