मुंबई, ता. 08 : पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत २ रुपयांनी वाढ झाल्यानंतर आता घरगुती गॅस सिलिंडरही ५० रुपयांनी महागला आहे. पेट्रोल-डिझेल आणि गॅस सिलिंडरच्या दरात वाढ झाल्यानंतर सर्वसामान्यांना दुहेरी झटका बसला आहे. ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी एलपीजी सिलिंडरच्या दरात वाढ केली आहे. आज रात्रीपासून नवी दरवाढ लागू होणार आहे. याचा थेट फटका सर्वसामान्य ग्राहकांना बसणार आहे. घरगुती गॅस सिलेंडर म्हागल्याने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार आहे. Domestic cylinder became expensive


उज्ज्वला गॅस सिलिंडर आधी ५०३ रुपयांना मिळत होता. आता तोच सिलिंडर ५५३ रुपयांना मिळणार आहे. दिल्लीत एलपीजी सिलिंडरचे दर ८०३ रुपयांऐवजी ८५३ रुपयांना मिळणार आहे. १४ किलोंचा घरगुती गॅस सिलिंडरचा दर ५० रुपयांनी महागला आहे. दिल्लीत एलपीजी गॅस सिलिंडर ८५३ रुपयांना मिळणार आहे. आहेत. उज्वला योजनेतील ग्राहकांना देखील ही गॅस सिलेंडरची दरवाढ लागू होणार आहे. Domestic cylinder became expensive
सध्या मुंबईसह आसपासच्या शहरात घरगुती LPG गॅस सिलेंडरचे दर 802 रुपये आहेत. दरवाढ लागू झाल्यानंतर ग्राहकांना एका सिलेंडरसाठी 825 रुपये मोजावे लागणार आहेत. आज मध्यरात्री पासून ही दरवाढ लागू होणार आहे. दरम्यान, पेट्रोल-डिझेलच्या उत्पादन शुल्कात वाढ करण्यात आली आहे. केंद्र सरकारकडून उत्पादन शुल्कात प्रत्येकी 2 रुपयांची वाढ करण्यात आलीय. मात्र पेट्रोल-डिझेलचे दर जैसे थेच राहणार आहेत. पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणतीही वाढ होणार नाही असे सांगितले जात आहे. Domestic cylinder became expensive