गुहागर, ता. 25 : तालुक्यातील वेळणेश्वर येथील विद्या प्रसारक मंडळ, ठाणे संचालित महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (Maharishi Parashuram College of Engineering) प्रथम वर्ष अभियांत्रिकी विभागातील श्री. गणेश आनंदराव दिवे यांना डॉक्टरेट पदवी प्राप्त झाली आहे. त्यांना नुकतेच शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर कडून इंग्रजी विषयात विद्या वाचस्पती पदवी बहाल करण्यात आली. त्यांच्या संशोधन प्रबंधाचे शीर्षक Fantasy & Satire in the Select Novels of Terry Pratchett: A Study असे आहे. Doctorate degree to Ganesh Dive


डॉ. गणेश दिवे यांनी टेरी प्रॅचेट या ब्रिटीश लेखकाच्या डिस्कवर्ल्ड कादंबरांच्या मालिकेतील काल्पनिक घटक व उपहास बाबत अभ्यास करून दोन शोधनिबंध सुद्धा प्रकाशित केले. या संशोधनातून काल्पनिक कथा, कादंबऱ्यांच्या वाचकांना प्रेरणा मिळेल व लेखक काल्पनिक घटकांचा वापर करून समाजप्रबोधन कसे करतो याचेही आकलन होईल. या संशोधनात डॉ. गणेश दिवे यांना राजर्षि शाहू महाराज महाविद्यालय, रुकडी येथील प्राचार्य डॉ. प्रशांतकुमार कांबळे यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले. Doctorate degree to Ganesh Dive
त्यांच्या या यशाबद्दल विद्या प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ. विजय बेडेकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र सोनी, उपप्राचार्य अविनाश पवार, सर्व विभागातील विभागप्रमुख व इतर शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले. Doctorate degree to Ganesh Dive