• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
16 February 2026, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

तळवली धान्य दुकानात आनंदाचा शिधा वाटप

by Ganesh Dhanawade
November 1, 2022
in Guhagar
18 1
0
Diwali ration distribution at Talwali

तळवली रास्त धान्य दुकानामध्ये आनंदाचा शिधा वाटप

36
SHARES
103
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 01 : तळवली रास्त धान्य दुकानामध्ये राज्य शासनाचा आनंदाचा शिधा वाटप शिधापत्रिकाधारकांना करण्यात आला.  ऐन दिवाळीच्या तोंडावर शिधापत्रिका धारकांना रास्त धान्य दुकानांमध्ये राज्य शासनाने दिवाळी भेट देण्याची घोषणा केली होती. मात्र सर्व रास्त दुकानांवर ही भेट पोहचण्यास विलंब झाल्याने थोडे उशिराने तिचे वाटप केले जात आहे. Diwali ration distribution at Talwali

यावर्षी प्रथमच शिंदे-फडणवीस सरकारने सर्वसामान्यांची दिवाळी गोड व्हावी, यासाठी रास्त धान्य दुकानांवर केवळ 100 रुपयांमध्ये शिधा वाटप करण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार ही दिवाळी भेट रास्त धान्य दुकानांमध्ये पोच करण्यात आली आहे. यामध्ये 100 रुपये इतक्या माफक किंमतीत 1 किलो चणाडाळ,1 किलो रवा,1 किलो साखर,1 लीटर पामतेल अशा प्रकारच्या वस्तूंचा आनंदाचा शिधा म्हणून शिधापत्रिकाधारकांना दिला आहे. Diwali ration distribution at Talwali

तळवली येथील रास्त धान्य दुकानावर नुकतेच हा आनंदाचा शिधा शिधापत्रिकाधारकांना वाटप करण्यात आला. यावेळी तळवली रास्त धान्य दुकानचालक गुरुनाथ कारेकर यांनी शिधापत्रिकाधारकांकडे हा आनंदाचा शिधा सुपूर्द केला. राज्यशासनाच्या या दिवाळी भेटीने नागरिकांना एक अनोखी दिवाळी भेट मिळाली आहे. Diwali ration distribution at Talwali

Tags: Diwali ration distribution at TalwaliGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share14SendTweet9
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.