एसटी महामंडळाचा मोठा निर्णय
मुंबई, ता. 15 : दिवाळीआधी दरवर्षी एसटी महामंडळाकडून 10 टक्के भाडेवाढ करण्यात येते. पण यंदा ही हंगामी भाडेवाढ रद्द करण्याचा निर्णय एसटी महामंडळाकडून घेण्यात आला आहे. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत टोलमाफीसह मंत्रिमंडळ बैठकींत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. त्याच पार्श्वभूमीवर आता राज्य एसटी महामंडळाने हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. Diwali fare hike of ST canceled
दिवाळी आणि उन्हाळी हंगामातील गर्दीतून उत्पन्न वाढीसाठी महामंडळ दरवर्षी हंगामी भाडेवाढ करत असते. महामंडळाच्या धोरणानुसार गर्दीच्या हंगामात भाडेवाढ करण्याचा अधिकार राज्य परिवहन गर्दीतून उत्पन्न वाढीसाठी करते. त्या प्रमाणे याही वर्षी दरवाढीचा निर्णय घेण्यात आला होता. आता तो निर्णय रद्द केला आहे. यावर्षी 25 ऑक्टोबर ते 24 नोव्हेंबर दरम्यान 10 टक्के हंगामी भाडेवाढ करण्यासंदर्भातील परिपत्रक जारी करण्यात आले होते. एसटीची प्रस्तावित 10 टक्के भाडेवाढ विठाई, शिवशाही, निमआराम बसेससाठी लागू होणार होती. पण, ती भाडेवाढ रद्द करण्यात आली. मुंबई ते पुणे मार्गावर शिवनेरीसाठी भाडेवाढ लागू करण्यात आलेली नव्हती. Diwali fare hike of ST canceled
एसटीने हंगामी भाडेवाढ रद्द करण्याचा निर्णय घेतल्यामुळे महामंडळाच्या तिजोरीत जमा होणारी अतिरिक्त रक्कम यंदा जमा होणार नाही. एसटीला दिवाळीच्या काळात चांगले उत्पन्न मिळते. यावर्षीही उत्पन्न वाढीसाठी हा मार्ग स्वीकारला होता. परंतु आता भाडेवाढ करण्याचा निर्णय रद्द करण्यात आला आहे. आता विठाई, शिवशाही, निमआराम बसेससाठी भाडेवाढ लागू असणार नाही. राज्य परिवहन महामंडळाला सध्या रोज 23 ते 24 कोटी रुपयांचे उत्पन्न प्रवासी वाहतुकीतून मिळतात. तसेच दिवाळीत करण्यात येणाऱ्या हंगामी भाडेवाढीमुळे त्यात अधिक 6 कोटी रुपयांची भर पडते. यामुळे दिवाळीच्या सुटीच्या काळातील महिन्यात महामंडळाचे उत्पन्न 950 ते एक हजार कोटी रुपये होते. Diwali fare hike of ST canceled