आर एच पी फाऊंडेशनमुळे घरगुती व्यवसाय करण्यास मिळाली चालना
रत्नागिरी, ता. 03 : चिपळुण येथील सौ. श्रावणी चंद्रशेखर शिंदे हिला आर एच पी फाउंडेशन रत्नागिरी यांच्या मदतीने आणि अलटीयस कंपनीच्या सहकार्याने नॅसिओ संस्था चेंबुर यांच्या सहाय्याने निओ मोशन गाडी मिळाली. या निओमोशन गाडीमुळे त्यांच्या आयुष्यात अमुलाग्र बदल होणार आहे. ती पुर्णत: सेल्फ डिपेंडन्ट बनणार आहे. कोणाच्याही मदतीशिवाय बाहेर जावुन काम करु शकणार आहे. अर्थिक दृष्ट्या सक्षम होणार आहे. यावेळी श्रावणी आणि तिच्या कुटुंबियांनी आरएचपी फाउंडेशन आणी इतर सर्वांचेच मनापासुन आभार मानले आहेत. या गाडीसाठी श्री अशोक भुस्कुटे सर यांच्याद्वारे आरएचपी फाउंडेशन रत्नागीरीचे अध्यक्ष श्री सादिक करीम नाकाडेंशी संपर्क साधुन सगळी माहिती दिली. Divyang Shravani got mechanical wheelchair


श्रावणी चंद्रशेखर शिंदे ही एकवर्षाची असताना तापात उजव्या पायाला पोलिओ झाला. आईने खुप कष्टाने तिचे संगोपन केले. कारण वडील ती जन्माला येण्याआधीच निधन पावले होते. तिला दोन बहीणी आहेत. लहानपणी आई उचलुन शाळेत घेवुन जायची आणायची. तिने कसेतरी ७ वीपर्यत शिक्षण पुर्ण केले. ती काठी घेवुन गुडघ्यावर हात देवुन चालायची. २००८ साली श्री.चंद्रशेखर शिंदे यांचेशी श्रावणीचा विवाह झाला. ते बेकरीमधे काम करायचे. एक मुलगी झाली आणि २०१० साली अचानक तिचे मिस्टर कुठेतरी निघुन गेले. आजतागायत त्यांचा काहीही ठावठीकाणा नाही. मुलगी हिंदवी आता १४ वर्षांची झाली. यावर्षी तिने १०वीची परीक्षा दिली आहे. Divyang Shravani got mechanical wheelchair
श्रावणी एकटी मुलीचा सांभाळ करते. सध्या ती घरघंटी चालवते. शिलाईमशीनवर थोडफार काम करते. खाद्य पदार्थ विक्री करून उदरनिर्वाह चालवते. तिच्या बहीणी तिला गरजेला मदत करत असतात. २०२० साली श्रावणीची आई निधन पावली तिचा आधारच निघुन गेला. काठी घेवुन चालताना चांगल्या डाव्या पायाच्या गुडघ्यावर हात ठेवुन चालावे लागे. त्यामुळे गुडघ्यावर प्रेशर येवुन तिथे फ्रॅक्चर झाले. त्याचे २०२०साली ऑपरेशन करावे लागले. फार लांब चालणे शक्य नसल्याने व्हिलचेअर वापरावी लागत आहे. बाहेरची कामं करणेसाठी इतरांवर अवलंबुन रहावे लागत असे. या निओमोशन गाडीमुळे तिच्या आयुष्यात अमुलाग्र बदल होणार आहे. Divyang Shravani got mechanical wheelchair