अपंग पुनवर्सन संस्थेतर्फे फळ वृक्षांचे वाटप
गुहागर, ता. 04 : फळ वृक्ष लागवडीद्वारे पर्यावरण संवर्धन या संकल्पनेतून गुहागर तालुका अपंग पुनवर्सन संस्थंने तालुक्यातील सर्व दिव्यांगाना फळवृक्षाचे रोप देण्याचा निश्चय केला आहे. प्रत्येक दिव्यांग व्यक्तीने आपल्या पसरदारात, जागेत किमान फळवृक्षाचे एक रोप लावावे, असे आवाहन संस्थेचे कार्यकर्ते करीत आहेत. Divyang joined for tree plantation


गुहागर तालुका अपंग पुनवर्सन संस्थेतर्फे 10 सप्टेंबर 2023 रोजी वरवेली येथील संस्थेच्या कार्यालयात सकाळी 10 वा. फळ वृक्ष रोपांचे वाटप करण्यात येणार आहे. संस्थेच्या सर्व दिव्यांग सभासदांसह तालुक्यातील सभासद नसलेल्या दिव्यांगानीही या कार्यक्रमाला उपस्थित रहावे. असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष उदय रावणंग यांनी केले आहे. Divyang joined for tree plantation


या उपक्रमाची माहिती देताना संस्थेचे सरचिटणीस सुनील रांजाणे म्हणाले की, वृक्ष लागवडीचा उपक्रम सर्वजण घेतात. आम्ही त्याला फळांच्या वृक्षाची जोड दिली आहे. आंबा, काजू, फणस, जांभुळ अशी फळे देणारे तसच दिर्घ काळ जगणाऱ्या वृक्षांची लागवड आम्हाला अभिप्रेत आहे. जेणेकरुन पुढची पिढी हे झाड लावणाऱ्या दिव्यांगांचे स्मरण करेल. त्या परिवारामध्ये सदर दिव्यांग व्यक्तीचे नाव सन्मानाने घेतले जाईल. असा एक वेगळा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आम्ही हा उपक्रम राबवित आहोत. उपक्रम यशस्वी करण्यासाठी अपंग पुनर्वसन संस्थेद्वारे तालुक्यातील सर्व दिव्यांगाना फळवृक्षाचे रोपटे मोफत देण्यात येणार आहे. या फळवृक्षाची लागवड आणि जोपासना त्यांनी करावी. अशी अपेक्षा आहे. Divyang joined for tree plantation


फळवृक्ष रोप वाटप कार्यक्रमाचे वेळी दिव्यांगाना व्यवसायातील संधी कोणत्या आहेत. सदर व्यवसायासाठी कर्ज कसे उपलब्ध होऊ शकते. विक्रीची व्यवस्था कशी करावी. या विषयीचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तरी तालुक्यातील दिव्यांगानी आपल्या आजुबाजूच्या दिव्यांगानाही सोबत घेऊन वरवेलीतील संस्थेच्या कार्यालयात 10 सप्टेंबर २०२३ रोजी उपस्थित रहावे. असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष उदय रावणंग व सरचिटणीस सुनील रांजाणे यांनी केले आहे. Divyang joined for tree plantation