गुहागर, ता. 05 : नाशिक येथे आज दि. 5 व 6 ऑगस्ट 2023 रोजी 50 व्या राज्य स्तरीय जुनीयर व सिनीयर गट राज्य जुदो स्पर्धा संपन्न होणार आहेत. या स्पर्धेसाठी जिल्हा संघाची निवड दि 30 जुलै रोजी गुहागर येथे करण्यात आली. जिल्हा निवड चाचणी घेण्यासाठी निषाद मोहिते, श्रावणी नागे, आर्या भारती यांचे सहकार्य लाभले. District Team Selection for State Judo Tournament


या जिल्हा संघात कु अर्चीता लहू सुर्वे, कु श्रद्धा अनिल चाळके, कु आर्या मंगेश मोरे, आबासाहेब देसाई, रूतिकेश नित्यानंद झगडे यांची निवड झाली आहे. या यशस्वी खेळाडूंना रत्नागिरी जिल्हा जुदो संघटनेचे अध्यक्ष श्री निलेश गोयथळे, जुदो प्रशिक्षक सोनाली वरंडे, समिर पवार, मंगेश मोरे यांनी शुभेच्छा दिल्या. District Team Selection for State Judo Tournament

