रत्नागिरी, दि. 13 : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात सोमवार दि. 16 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 ते 1 या वेळेत महिला लोकशाही दिन साजरा करण्यात येणार आहे. याचे आयोजन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी तथा सदस्य सचिव यांचेमार्फत करण्यात आले आहे. District Level Women Democracy Day


समस्याग्रस्त महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे, तसेच पिडीत महिलांच्या हक्कांचे संरक्षण होऊन त्यांना न्याय मिळण्यासाठी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन दर महिन्याच्या तिस-या सोमवारी जिल्हधिकारी कार्यालयाच्या सभागृहात साजरा करण्यात येतो. यावेळी अर्जदार महिला स्वत: उपस्थित राहून त्यांच्या तक्रारींच्या अनुषंगाने निवेदन सादर करतात व त्याअनुषंगाने जिल्हा स्तरावरील संबंधित अधिकाऱ्यांना महिलांचे वैयक्तिक प्रश्नाबाबत कार्यवाहीबाबत निर्देश देण्यात येतात. District Level Women Democracy Day